शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सुनंदाप्रकरणी थरूर यांची लवकरच चौकशी

By admin | Updated: January 13, 2015 00:15 IST

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरुर यांना येत्या काही दिवसांत विशेष तपास पथकाच्या(एसआयटी) चौकशीला सामोरे जावे लागू शकते़

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरुर यांना येत्या काही दिवसांत विशेष तपास पथकाच्या(एसआयटी) चौकशीला सामोरे जावे लागू शकते़सोमवारी दिल्लीचे पोलीस आयुक्त बी़एस़ बस्सी यांनी ही माहिती दिली़ १७ जानेवारी दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलात सुनंदा मृतावस्थेत आढळल्या होत्या़ या हॉटेलमधील पुराव्यांशी छेडछाड केली गेल्याचे वृत्त मीडियाने दिले आहे, याबाबत बस्सी यांना छेडले असता, हे वृत्त निराधार असल्याचे ते म्हणाले़ ते म्हणाले की, थरुर दिल्लीला आले आहेत, हे मला ठाऊक आहे़ आमचा तपास सुरू आहे़ येत्या काही दिवसांत एसआयटी त्यांची चौकशी करू शकते़पाकिस्तानी पत्रकारा मेहर तरार यांच्या चौकशीची शक्यताही त्यांनी नाकारली नाही़ एसआयटीला आवश्यक वाटल्यास त्यांचीही चौकशी केली जाऊ शकते, असे बस्सी यांनी स्पष्ट केले़ सुनंदा यांच्या विसेरा नमुने अद्याप तपासणीसाठी विदेशात पाठविण्यात आलेले नाही़ काही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे नमुने पाठविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले़ १७ जानेवारी २०१४ रोजी चाणक्यपुरीस्थित लीला पॅलेस या पंचतारांकित हॉटेलच्या खोली क्रमांक ३४५ मध्ये सुनंदा यांचा मृतदेह आढळला होता़ यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत होते़ पाकिस्तानी महिला पत्रकार मेहर तरार यांच्याशी थरुर यांचे कथित संबंध आणि त्यावरून शशी थरुर आणि सुनंदा यांच्यातील तणाव असा एक या प्रकरणाचा कंगोरा या निमित्ताने समोर आला होता़ सुनंदा यांनी या प्रकरणावरून टिष्ट्वटरवर व्यक्त केलेला संताप आणि यानंतर शशी थरुर यांनी सुनंदा यांचे टिष्ट्वटर अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला, असे हे प्रकरण गाजले होते़ विशेष म्हणजे यापश्चात शशी थरुर आणि सुनंदा यांनी आम्ही आनंदाने एकत्र नांदत असल्याचे संयुक्त पत्र सोशल नेटवर्किंग साईटवर टाकून हा विषय इथेच संपल्याचे जाहीर केले होते़ यानंतर काही दिवसात सुनंदा यांचा मृतदेह आढळून आला होता़ मात्र त्यांची आत्महत्या की हत्या, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)