शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Coronavirus: “मला आनंद आणि अभिमान वाटतो की...”; पाचवीतील मुलीने सरन्यायाधीशांना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 2:28 PM

Coronavirus: त्रिशूर येथे पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलींने थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना पत्र लिहिले आहे.

ठळक मुद्देपाचवीत शिकणाऱ्या मुलीचे थेट सरन्यायाधीशांना पत्रसरन्यायाधीशांनी काय उत्तर दिले?

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात हाहाःकार उडाला असताना ऑक्सिजन, रेमडेसिवीर, कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असताना सर्वोच्च न्यायालयाने विविध याचिकांवर सुनावणी करताना महत्त्वाचे निर्देश दिले. याचा उपयोग सर्वसामान्यांना झाला. याच पार्श्वभूमीवर केरळमध्ये असलेल्या त्रिशूर येथे पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलींने थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या मुलीचे नाव लिडविना जोसेफ असे आहे. (thank you your honour class 5 girl wrote to cji Ramana over corona and gets reply) 

लिडविना जोसेफने थेट सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना पत्र लिहून त्यासोबत एक चित्र जोडले आहे. यामध्ये एक न्यायाधीश करोनावर हल्ला करतांना दाखवले आहेत. या मुलीला सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्याकडून उत्तर देखील मिळाले आहे. तिच्या सुंदर पत्रानिमित्त सरन्यायाधीशांनी या लहानगीला शुभेच्छा देऊन तिला एक पत्र लिहिले.

“भले लोकांचा तडफडून जीव जाऊ दे, पण नरेंद्र मोदींची महानता कायम राहिली पाहिजे”

मला आनंद आणि अभिमान वाटतो 

दिल्ली आणि देशाच्या इतर भागात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबद्दल मला फार काळजी होती. मला वृत्तपत्रातून कळले की, कोविड- १९ विरुद्ध सामान्य लोकांच्या दु: ख आणि मृत्यूबद्दलच्या लढ्यात माननीय न्यायालयाने प्रभावीपणे हस्तक्षेप केला आहे. आदरणीय कोर्टाने ऑक्सिजनपुरवठा करण्याचे आदेश दिले आणि बर्‍याच लोकांचे जीव वाचवले. मला समजते की माननीय न्यायालयाने आपल्या देशात खासकरुन दिल्लीत कोविड -१९ आणि मृत्यु दर कमी करण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. मी याबद्दल धन्यवाद देते. आता मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो, असे लिडविना जोसेफने आपल्या पत्रात म्हटले आहे. 

केंद्र सरकार आणखी १० कंपन्यांची करणार विक्री; निर्गुंतवणूक समिती गठीत

सरन्यायाधीशांनी काय उत्तर दिले?

सरन्यायाधीश रमणा यांनी उत्तरादाखल पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मला आपले सुंदर पत्र प्राप्त झाले आहे आणि यामध्ये एका श्रमजीवी न्यायाधीशांचे हृदयस्पर्शी चित्र आहे. देशातील घडामोडींवर आणि देशभर आजार उद्भवल्यानंतर आपण लोकांच्या आरोग्यासाठी जी काळजी दाखविली आहे त्याकडे आपण लक्ष ठेवले आहे, याबद्दल खरोखर प्रभावित झालो आहे. मला खात्री आहे की आपण जागरूक, जागरूक आणि जबाबदार नागरिक व्हाल, जे राष्ट्र उभारणीत मोठे योगदान देईल, असे रमणा यांनी शुभेच्छा देत म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनCorona vaccineकोरोनाची लसN V Ramanaएन. व्ही. रमणाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय