शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराच्या धडक कारवाईमुळे धाबे दणाणलेल्या दहशतवाद्यांनी केली काश्मिरी तरुणाची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 17:44 IST

भारतीय लष्कराने गेल्या काही महिन्यांमध्ये धडक कारवाया करून काश्मिरमधील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे.  लष्कराच्या या कारवाईमुळे धाबे दणाणलेल्या  दहशतवाद्यांनी आता स्थानिका काश्मिरी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

श्रीनगर, दि. 18 - भारतीय लष्कराने गेल्या काही महिन्यांमध्ये धडक कारवाया करून काश्मिरमधील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे.  लष्कराच्या या कारवाईमुळे धाबे दणाणलेल्या  दहशतवाद्यांनी आता स्थानिका काश्मिरी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी इश्तियाक अहमद या तरुणाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केली आहे.  इश्तियाक हा काश्मिरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहडा गावातील नागरिक होता.मिळालेल्या माहितीनुसार, इश्तियाक अहमदने दिलेल्या खबरीवरून भारतीय लष्कराने लष्कर ए तोयबाच्या तीन कमांडरांना कंठस्नान घातल्याचा संशय दहशतवाद्यांना होता. 7 ऑगस्ट रोजी दहशतवाद्यांनी इश्तियाकचे अपहरण केले होते. त्यानंतर दहशतवादी त्याला शोपियाँन येथे घेऊन गेले. तेथे दहशतवाद्यांनी बंदूकीचा धाक दाखवून त्याच्याकडून आपण लष्कराची मदत केल्याचे कबूल करून घेतले. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. इश्तियाकच्या संपूर्ण कबुलीजबाबाचा दहशतवाद्यांनी व्हीडिओ बनवला. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर भारतीय लष्करानेही झटपट पावले उचलत हा व्हिडिओ बनवण्यामागे कुठले दहशतवादी आहेत. त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.   भारतीय लष्कराने उघडलेल्या आक्रमक मोहीमेमुळे काश्मीरमध्ये सक्रीय असलेल्या दहशतवादी संघटना जेरीस आल्या आहेत. आपल्यातीलच काही दहशतवादी फितूर झाल्याचा संशय त्यांना आहे. दरम्यान, भारतीय लष्कराला टीप देत असल्याच्या संशयावरून झाकीर मुसा या दहशतवाद्याविरोधातही काश्मीर खोऱ्यात पोस्टर्स लागले आहेत. जम्मू काश्मीरमधील शोपियन येथे सर्व ठिकाणी हिजबूल मुजाहिद्दीनचे पोस्टर्स चिकटवलेले दिसत आहेत. या पोस्टर्सच्या माध्यमातून हिजबूलने आपला माजी कमांडर झाकीर मुसाविरोधात राग व्यक्त केला आहे. झाकीर मूसा काश्मिरींची हत्या करण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांची मदत करत आहे असं या पोस्टर्समध्ये लिहिण्यात आलं आहे. पोस्टर्सच्या माध्यमातून लोकांनाही उकसवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'हा भारतीय एजंट झाकीर मूसा जिथे कुठे भेटेल, त्याला पकडून मारुन टाका', असं आवाहनच हिजबूल मुजाहिद्दीनचे पोस्टर्समधून केलं आहे. 

हे पोस्टर्स उर्दू भाषेत आहेत. सर्व पोस्टर्समध्ये झाकीर मुसाचा फोटो लावण्यात आला आहे. पोस्टर्समधून दावा करण्यात आला आहे की, 'भारतीय लष्कराकडून मोठी रक्कम घेऊन झाकीर मुसा निर्दोष काश्मिरींची हत्या करत आहे. विश्वासघाती सरकारला मदत करत झाकीर मूसा श्रीमंत होण्याची स्वप्नं बघत आहे. सुरुवातील तो हिजबून मुजाहिद्दीनचा भाग होता, पण आता त्याने भारत सरकारशी हातमिळवणी केली आहे. अशा परिस्थितीत तो जिथे कुठे भेटेल, त्याला मारुन टाका'.

टॅग्स :TerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू काश्मिरIndian Armyभारतीय लष्करIndiaभारत