शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

उधमपूरमधील ट्रक हल्ला, क्लीनरच्या मृत्यूमुळेच काश्मीरमध्ये तणाव

By admin | Updated: October 19, 2015 15:53 IST

उधमपूरमध्ये गोहत्येच्या संशयावरुन जमावाने केलेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ल्यात गंभीररित्या भाजलेल्या ट्रक क्लीनरचा मृत्यू झाल्याने जम्मू काश्मीरमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. १९ - उधमपूरमध्ये गोहत्येच्या संशयावरुन जमावाने केलेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ल्यात गंभीररित्या भाजलेल्या ट्रक क्लीनरचा मृत्यू झाल्याने जम्मू काश्मीरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सोमवारी कडेकोट बंदोबस्तात या तरुणाचा दफनविधी पार पडला असला तरी काश्मीर घाटीत ब-याच ठिकाणी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली. 

अंनंतनागमधील रहिवासी असलेला जाहिद रसूल हा ट्रक क्लीनर म्हणून काम करत होता. १० दिवसांपूर्वी जाहिद व ट्रक चालक शौकत अहमद हे दोघे ट्रक घेऊन काश्मीरला निघाले होते. मात्र यादरम्यान जमावाने गोहत्येच्या संशयावरुन या ट्रकवर हल्ला केला व पेट्रोल बॉम्ब टाकून ट्रक पेटवून दिला. यात जाहिद आणि शौकत हे दोघेही गंभीररित्या भाजले होते. जाहिदवर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

जाहिदच्या मृत्यूनंतर फुटिरतावादी संघटनांनी आज (सोमवारी) काश्मीर बंदची हाक दिली. सोमवारी विमानाने जाहिदचे पार्थिव काश्मीरमध्ये आणण्यात आले. जाहिदच्या मूळगावी त्याच्या पार्थिवाचे दफन करण्यात आले.  कुलगाम येथे आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झडप झाली. काश्मीरमधील विविध भागात रास्ता रोको तसेच रेल रोकोही करण्यात आला. काश्मीर घाटीतील आठ गावांमध्ये संचारबंदीसारखी स्थिती आहे.