ढगाळ वातावरणाने तापमान घटले

By Admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:00+5:302015-03-25T21:10:00+5:30

सोलापूर: ढगाळ वातावरणामुळे सोलापूरच्या तापमानात बुधवारी घट झाली. आजच्या दिवशी 40.8 अंश इतके तापमान नोंदले गेले.

The temperature in the cloudy environment decreased | ढगाळ वातावरणाने तापमान घटले

ढगाळ वातावरणाने तापमान घटले

लापूर: ढगाळ वातावरणामुळे सोलापूरच्या तापमानात बुधवारी घट झाली. आजच्या दिवशी 40.8 अंश इतके तापमान नोंदले गेले.
राज्यात सर्वात कमी तापमान नांदेड येथे 18.0 अंश इतके नोंदले गेले. राज्यात सर्वत्र हवामान कोरडे होते. येत्या रविवारपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. कोकण-गोवा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ होती. कोकण- गोवा व विदर्भाच्या काही भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली.
गेल्या 24 तासात राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान: मुंबई: 31.4, रत्नागिरी: 33.5, पुणे: 37.7, कोल्हापूर: 37.5, महाबळेश्वर: 32.5, अहमदनगर: 39.8, जळगाव: 40.0, मालेगाव: 40.0, नाशिक: 38.3, सांगली: 38.0, सातारा: 37.8, उस्मानाबाद: 39.9, औरंगाबाद: 38.4, परभणी: 39.4, अकोला: 39.9, अमरावती: 38.8, बुलडाणा: 37.0, चंद्रपूर: 40.4, नागपूर: 40.1, वाशिम: 38.8, यवतमाळ: 37.0.

Web Title: The temperature in the cloudy environment decreased