शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

राज्यसभा टीव्हीवर विरोधकांची भाषणे कापून मोदी आणि शहांना प्राईम टाईम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2018 8:44 AM

राज्यसभा टीव्हीवर विरोधकांच्या तुलनेत अमित शहा यांची भाषणेच जास्तवेळा दाखवली जातात.

नवी दिल्ली: राज्यसभेतील कामकाज आणि संसदेतील घडामोडींचे वार्तांकन करणारी राज्यसभा टीव्ही ही वृत्तवाहिनी भाजपाच्या दावणीला बांधण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्या लोकसभेतील भाषणाचा काही अंश जाणूनबुजून कापण्यात आल्याचे गुलाम नबी आझाद यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. राज्यसभा टीव्हीचे अशाप्रकारे भाजपा टीव्हीत रुपांतर करणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले. डेरेक ओब्रायन यांनी लोकसभेत नुकतेच एक भाषण केले होते. त्यावेळी पहिली चार मिनिटे त्यांचे भाषण राज्यसभा टीव्हीवर प्रसारित करण्यात आले नव्हते. योगायोग म्हणजे याचवेळात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली होती. याशिवाय, विरोधकांच्या दाव्यानुसार राज्यसभा टीव्हीवर विरोधकांच्या तुलनेत अमित शहा यांची भाषणेच जास्तवेळा दाखवली जातात. विरोधी नेत्यांना आणि अन्य वार्तांकनाला अगदी थोडावेळच दिला जातो. उरलेला 98 टक्के वेळ अमित शहा यांच्यासाठीच खर्ची घातला जातो, असा आरोप विरोधकांनी केला. या प्रकाराबद्दल राज्यसभा टीव्हीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. डेरेक ओब्रायन यांचे भाषण सुरू असताना आमच्या मुख्य कार्यालयातील वीज काही वेळासाठी गेली होती. मात्र, हा बिघाड तातडीने दुरुस्त करून अवघ्या चार मिनिटांत त्यांच्या भाषणाचे प्रसारण पुन्हा सुरु करण्यात आले, असे राज्यसभा टीव्हीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, हा प्रकार म्हणजे आणीबाणी असल्याची टीका डेरेक ओब्रायन यांनी केली. तर गुलाम नबी आझाद यांनीही भाजपा राज्यसभा टीव्ही पक्षाच्या प्रचारासाठी वापरला जात असल्याचे म्हटले. भाजपाने इतर वृत्तवाहिन्यांना आपल्या दावणीला बांधले आहे. मात्र, राज्यसभा टीव्हीच्या बाबतीत तसे करू नका. या सगळ्याची सर्वपक्षीय समितीकडून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असणाऱ्या उपराष्ट्रपतींच्या संपूर्ण नियंत्रणाखाली राज्यसभा टीव्ही चालतो. यापूर्वी उपराष्ट्रपतीपद काँग्रेसच्या हमीद अन्सारी यांच्याकडे असल्यामुळे केंद्रात भाजपाची सत्ता असूनही राज्यसभा टीव्हीचा कारभार स्वायत्तपणे सुरू होता. राज्यसभा टीव्हीने अनेकदा सरकारविरोधी भूमिकाही घेतली आहे. यावरून भाजपा नेत्यांमध्ये तीव्र नाराजी होती. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा