शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
3
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
4
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
5
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
6
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
7
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
8
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
9
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
10
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
11
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
13
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
14
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
15
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
16
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
17
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
18
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
19
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
20
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

९५ माकडांना विषारी अन्न खायला दिले; १५ जणांचा मृत्यू, ८० जणांची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:59 IST

या घटनेमुळे पशुप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Telangana Crime: तेलंगानातील कामारेड्डी जिल्ह्यातून मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील अंतमपल्ली गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका ढाब्यावर अनेक माकडांना विष देऊन मारण्यात आले. या घटनेत किमान १५ माकडांचामृत्यू झाला असून सुमारे ८० माकडे गंभीर अवस्थेत आढळून आली आहेत.

नेमकं काय घडलं?

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ गावचे सरपंच आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवले. पथकाने घटनास्थळी दाखल होऊन आजारी माकडांवर तातडीने उपचार सुरू केले. वेळेत मदत मिळाल्यामुळे अनेक माकडांचे प्राण वाचवण्यात यश आले.

८० माकडांची प्रकृती चिंताजनक

स्थानिकांच्या माहितीनुसार, जवळपास ८० माकडे अत्यंत नाजूक अवस्थेत आढळून आली. त्यांना चालणे-फिरणेही कठीण होत होते. मृत माकडांचे मृतदेह ढाब्याच्या परिसरात विखुरलेले आढळले. अज्ञात व्यक्तींनी जाणूनबुजून विषारी पदार्थ खाऊ घातल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

यापूर्वीही विषबाधेचे प्रकार

या घटनेमुळे पशुप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, कामारेड्डी जिल्ह्यातील मचारेड्डी आणि बिक्कनूर मंडळांमध्ये अलीकडेच माकडे आणि भटकी कुत्री यांना विष दिल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे ही घटना अधिकच चिंताजनक मानली जात आहे.

सरपंचांचा आरोप, तक्रार दाखल होणार

गावचे सरपंच महेंद्र रेड्डी यांनी सांगितले की, काही अज्ञात लोकांनी माकडांचा एक समूह व्हॅनमधून आणून राष्ट्रीय महामार्गावरील त्या ढाब्याजवळ सोडल्याचा संशय आहे. या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली जाणार आहे.

उपचार सुरू, तपास चालू

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाचवण्यात आलेल्या माकडांवर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती दिसल्यास तात्काळ प्रशासन किंवा पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Poisoned Food Kills 15 Monkeys, 80 Critically Ill in Telangana

Web Summary : In Telangana, poisoned food killed 15 monkeys and left 80 critically ill near a highway eatery. Villagers alerted authorities, who are treating the survivors. Suspicion falls on unknown individuals. Police are investigating after similar incidents in the district.
टॅग्स :TelanganaतेलंगणाMonkeyमाकडDeathमृत्यू