१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 13:42 IST2025-11-19T13:38:56+5:302025-11-19T13:42:40+5:30
हे विद्यार्थी, नर्सरीपासून ते दुसरी-तिसरीच्या वर्गापर्यंत शिकणारे असावेत. सर्व विद्यार्थी गणवेशात होते आणि त्यांच्यासोबत त्यांच्या स्कूल बॅग्स आणि पाण्याच्या बाटल्याही होत्या. ऑटोरिक्षात अशा पद्धतीने कोंबलेली ही मुलं पाहून, त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
तेलंगणातील नगरकरनूल येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी कशा पद्धतीने खेळ खेळला जातोय, हेच या घठनेतून समोर येते. येथे एका खासगी शाळेचे तब्बल २२ मुले एका पिवळ्या रंगाच्या ऑटोरिक्षातून (Auto-rickshaw) जाताना आढळून आले आहेत. वाहतूक पोलिसांनी जेव्हा या ऑटोरिक्षाला थांबवले आणि एक-एक करून विद्यार्थ्यांना खाली उतरवण्यास सांगितले, तेव्हा तेथील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.
हे विद्यार्थी, नर्सरीपासून ते दुसरी-तिसरीच्या वर्गापर्यंत शिकणारे असावेत. सर्व विद्यार्थी गणवेशात होते आणि त्यांच्यासोबत त्यांच्या स्कूल बॅग्स आणि पाण्याच्या बाटल्याही होत्या. ऑटोरिक्षात अशा पद्धतीने कोंबलेली ही मुले पाहून, त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
खासगी शाळा असूनही विद्यार्थांना अशा धोकादायक पद्धतीने प्रवास का करावा लागत आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचे उत्तर शोधताना एकूणच परिस्थितीचे गांभीर्यही लक्षात येते. अनेक खासगी शाळा बस वाहतुकीसाठी अवाजवी शुल्क आकारतात. भरमसाठ शैक्षणिक फी (Fees) भरणाऱ्या पालकांना वाहतुकीचा हा वाढीव खर्च पेलवत नाही. यामुळे नाइलाजाने, त्यांना आपल्या पाल्यांना अशा दोकादायक पद्धतीने ऑटोरिक्षातून पाठवावे लागते.
हा प्रकार केवळ तेलंगणातील नगरकरनूल पुरताच मर्यादित नाही तर, देशातील अनेक ठिकाणी, असे दृष्य दिसून येते. या गंभीर मुद्याकडे, सरकारांनी गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. खासगी शाळांच्या बस शुल्कावर नियंत्रण ठेवणे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी कठोर नियम बनवणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत त्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देणे आवश्यक आहे.