रुग्णाला एमआरआय मशिनमध्येच विसरले; श्वास घुसमटल्याने 35 मिनिटांनी स्वत: बाहेर आला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 05:02 PM2019-09-23T17:02:17+5:302019-09-23T17:03:01+5:30

हॉस्पिटलच्या तंत्रज्ञाची तक्रार त्यांनी हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांच्याकडे केली आहे.

technician forgot patient in the MRI machine; after 35 minutes he came out | रुग्णाला एमआरआय मशिनमध्येच विसरले; श्वास घुसमटल्याने 35 मिनिटांनी स्वत: बाहेर आला

रुग्णाला एमआरआय मशिनमध्येच विसरले; श्वास घुसमटल्याने 35 मिनिटांनी स्वत: बाहेर आला

Next

पंचकुला: पंचकुलाच्या सेक्टर 6 मधील सरकारी हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआरआय आणि सिटी स्कॅन सेंटरचा तंत्रज्ञ एका 59 वर्षांच्या व्यक्तीला मशिनमध्ये घालून विसरला. या दरम्यान, रुग्णाने हात-पाय मारत खूप प्रयत्न केले, मात्र बेल्ट बांधलेला असल्याने ते हलू शकले नाहीत. मात्र, नंतर श्वास घुसमटू लागल्याने त्यांनी शेवटचे प्रयत्न म्हणून जोर लावला आणि बेल्ट तुटल्याने ते बाहेर आले. 


राम मेहर यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. हॉस्पिटलच्या तंत्रज्ञाची तक्रार त्यांनी हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांच्यावकडे केली आहे. तसेच पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, जर मी आणखी 30 सेकंद बाहेर आलो नसतो तर मेलो असतो. 


या तक्रारीचे डॉक्टरांनी खंडन केले असून केंद्राचे अधिकारी मित खोखर यांनी सांगितले की मी तंत्रज्ञासोबत बोललो आहे. रुग्णाचे 20 मिनिटांचे स्कॅन करायचे होते. तंत्रज्ञाला शेवटची तीन मिनिटांचे सिक्वेंस घ्यायचे होते आणि २ मिनिटच उरले होते. मात्र, रुग्ण घाबरला आणि हलायला लागला. तंत्रज्ञाने त्याला हलण्यास मज्जाव केला. यावेळी तंत्रज्ञ दुसऱ्या मशिनवर नोट्स अपडेट करत होता. जेव्हा १ मिनिट शिल्लक होते तेव्हा तंत्रज्ञाने रुग्णाकडे पाहिले तो अर्धा बाहेर आला होता. तंत्रज्ञानेच त्यांना बाहेर आणले. 

Web Title: technician forgot patient in the MRI machine; after 35 minutes he came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.