शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

देशांतर्गत विमानसेवेत तांत्रिक समस्या

By admin | Updated: June 8, 2015 02:39 IST

देशांतर्गत (डोमेस्टिक) विमानसेवेला सध्या तांत्रिक समस्यांनी ग्रासले आहे. तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात विमानसेवा रद्द होत आहेत.

मुंबई : देशांतर्गत (डोमेस्टिक) विमानसेवेला सध्या तांत्रिक समस्यांनी ग्रासले आहे. तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात विमानसेवा रद्द होत असून, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत तांत्रिक अडचणी वाढल्याचे डीजीसीएच्या अहवालातून समोर आले आहे. यात सर्वाधिक तांत्रिक अडचणींचा सामना स्पाइस जेट, जेट लाइट, एअर इंडिया या विमान कंपन्यांना करावा लागत आहे. स्पाइस जेट, जेट लाइट, एअर इंडिया, एअर एशिया, जेट एअरवेज, एअर कोस्टा, गो एअर, विस्टारा आणि इंडिगो अशा देशांतर्गत सेवा देणाऱ्या विमान कंपन्या आहेत. या कंपन्यांनी दिलेल्या सेवेमुळे जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत २५१.0५ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. २0१४ च्या सुरुवातीच्या चार महिन्यांत तुलना केली असता २१.२८ टक्के त्यात वाढ आहे. मात्र ही वाढ जरी असली तरी अनेक कारणांमुळे विमान सेवा रद्द होत असून, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासही सोसावा लागत आहे. तांत्रिक, चालन प्रक्रिया, हवामानातील बिघाड आणि अन्य छोट्या कारणांमुळे विमान सेवा रद्द होत असून, यात तांत्रिक बिघाडाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे डीजीसीएच्या अहवालातून समोर आले आहे. २0१५ च्या जानेवारी १३.५ टक्के तांत्रिक कारणामुळे देशांतर्गत विमान सेवा रद्द झाल्या होत्या. मात्र फेब्रुवारी महिन्यात हेच प्रमाण पाहिले असता तब्बल ४८.२ टक्के झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे बदलत्या हवामानाचा फटकाही विमान सेवांना बसत आहे. जानेवारी महिन्यात ६६ टक्के हवामानातील बिघाडामुळे विमान सेवा रद्द झाल्या होत्या. एप्रिल महिन्यात हेच प्रमाण १९ टक्के झाल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)2015च्या जानेवारी महिन्यात स्पाइस जेट कंपनीच्या सेवा रद्द होण्याचे प्रमाण हे सर्वाधिक ३.७५ टक्के एवढ होते. त्यानंतर जेट लाइट, एअर इंडिया यांचे आहे. च्फेब्रुवारी महिन्यात विस्टारा कंपनीच्या सेवा रद्द होण्याचे सर्वाधिक प्रमाण २.२८ टक्के एवढे आहे. त्यानंतर जेट लाइट, एअर एशियाचा नंबर लागतो. च्मार्च महिन्यात स्पाइस जेट कंपनीच्या विमान सेवा रद्द होण्याचे प्रमाण १.८९ टक्के एवढे असून, त्यानंतर एअर इंडिया, एअर एशिया यांचा नंबर लागतो. च्एप्रिल महिन्यात एअर कोस्टा कंपनीच्या विमान सेवा रद्द होण्याचे प्रमाण सर्वाधिक ४.८५ टक्के एवढे आहे. त्यानंतर एअर इंडिया, जेट एअरवेज यांचा नंबर लागतो.