शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

उशीरा पोचल्याने संघाने रद्द केले व्ही. के. सिंहांचे भाषण

By admin | Updated: November 3, 2014 17:04 IST

आरएसएसच्या शिबीरात उशीरा पोहोचल्याने परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंह यांचे भाषण रद्द करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. ३ - प्रमुख वक्त्याची वाट पाहत तासनतास ताटकळत बसलेले श्रोते हे दृष्य काही नवीन नाही, पण वक्ता उशीरा पोहोचल्याने त्याचे सत्र रद्द करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय शिबिरादरम्यान एका सत्रात परराष्ट्र व्यवहार (राज्यमंत्री) जनरल व्ही. के.  सिंग यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते, मात्र कार्यक्रमस्थळी दीड तास उशीरा पोहोचल्याने त्यांचे भाषण करम्याची परवानगी नाकारण्यात आली. 
आग्रा येथे आरएसएसचे तीन दिवसीय 'युवा संकल्प शिबीर' आयोजित करण्यात आले होते. रविवारी सकाळी ११ वाजता व्ही. के. सिंह 'भारताचे संरक्षण व सुरक्षाविषयक धोरण' या विषयावर संबोधित करणार होते. मात्र ते वेळेवर न पोचू शकल्याने त्यांचे सत्र रद्द करून नियोजित कार्यक्रम पुढे सुरू ठेवण्यात आला. दुपारी साडेबाराच्या सुमारास तेथे पोचलेल्या सिंग यांना उशीरा येण्याची किंमत चुकवावी लागली. त्यांना इतर मान्यवरांसोबत नव्हे तर त्यांच्या मागे दुस-या रांगेत बसावे लागले आणि त्यांना भाषणाची संधी न देता शिबीरातील इतर कार्यक्रम सुरू राहिले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित होते. 
'कोणासाठीही कार्यक्रमांचे वेळापत्रक बदलणे हे संघाच्या तत्वात बसत नाही. सिंह यांचे भाषण ११ वाजता होते, त्यामुळे त्यांनी त्याआधीच कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणे अपेक्षित होते, मात्र ते साडेबारानंतर आले. उशीरा पोहोचल्याने त्यांना भाषणाद्वारे तरूणापर्यंत विचार पोहोचवण्याची परवानगी देण्यात आली नाही', असे संघाचे प्रवक्ते वीरेंद्र वर्षानेय यांनी सांगितले. 'नियम हे नियम असतात आणि ते सर्वांसाठी समान असतात. इतरांना शिस्तीचे धडे देण्याआधी आपण स्वत:च्या अंगी शिस्त बाणवली पाहीजे,' असेही ते म्हणाले. 
दरम्यान परदेशी जाण्यासाठी विमान पकडायचे असल्याचे कारण देत सिंह तेथून अर्ध्या तासात निघाले तसेच कोणतीही प्रतिक्रिया देण्यासही त्यांनी नकार दिला.