भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 21:12 IST2025-10-07T21:12:02+5:302025-10-07T21:12:54+5:30
Madhya Pradesh Crime News: शाळा हे विद्येचं मंदिर मानलं जातं. मात्र याच शाळेतील भर वर्गात एक शिक्षक महिलेसोबत अश्लील चाळे करताना सापडल्याने खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशमधील देवास जिल्ह्यातील आदिवासीबहुल भाग असलेल्या उदयनगर संकुलातील एका सरकारी शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
शाळा हे विद्येचं मंदिर मानलं जातं. मात्र याच शाळेतील भर वर्गात एक शिक्षक महिलेसोबत अश्लील चाळे करताना सापडल्याने खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशमधील देवास जिल्ह्यातील आदिवासीबहुल भाग असलेल्या उदयनगर संकुलातील एका सरकारी शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेतील शिक्षक विक्रम कदम याने शिक्षकी पेशाला कलंक लावणारं हे कृत्य केलं असून, या प्रकारामुळे पालक आणि शिक्षण विभागाची चिंता वाढवली आहे.
येथील बिलासी ग्रामपंचायतीच्या शासकीय प्राथमिक विद्यालय, झिरी मोहल्ला येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे शाळा सुरू असताना विक्रम कदम नावाचा एक शिक्षक एका महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना दिसला. यादरम्यान, काही मुलांनी त्यांचा गुपचूक व्हिडीओ काढून घेतला, आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
याबाबत ग्रामस्थांनी सांगितले की, सदर शिक्षक बऱ्याच दिवसांपासून शाळेत असले चाळे करत होता. हा शिक्षक अनेकदा मुलांसमोरच महिलेच्या गळ्यात हात घालून बसलेला असायचा. दोन दिवसांपूर्वीच गावातील पटेल आणि उपसरपंचांनी त्याची सार्वजनिकपणे कान उघाडणी केली होती. मात्र विक्रम कदम नावाच्या या शिक्षकाच्या वागण्यात फरक पडला नाही. या शिक्षकाविरोधात आधीही तक्रारी दाखल झाली होती. मात्र कुठलीच कारवाई झाली नसल्याने विक्रम हा निर्ढावला होता.
दरम्यान, या प्रकरणी शिक्षण अधिकारी हरिसिंह भारतीय यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशीसाठी एक पथक गावात पाठवण्यात येत आहे. या पथकाने चौकशी करून अहवाल दिल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.