शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

अन्नपदार्थाच्या दर्जावर भाष्य करणाऱ्या तेजबहादूर यांच्या व्हिडीओचा इसिसकडून गैरवापर- बीएसएफ प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 8:26 AM

नवी दिल्ली, दि. 28- बीएसएफचे निलंबित जवान तेजबहादूर यादव यांनी जानेवारी महिन्यात जवानांना मिळणाऱ्या अन्नपदार्थाच्या खराब दर्जाबद्दल भाष्य करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तेजबहादूर यांच्या या व्हिडीओवर सर्वस्तरावर चर्चाही झाली. पण आता तेजबहादूर यांनी शेअर केलेल्या त्या व्हिडीओवर बीएसएफने स्पष्टीकरण दिलं आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना पुरवलं जाणारं ...

ठळक मुद्दे तेजबहादूर यांनी शेअर केलेल्या त्या व्हिडीओवर बीएसएफने स्पष्टीकरण दिलं आहे.हे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना पुरवलं जाणारं अन्न चांगल्या दर्जाचे असून कोणीही याबद्दलची पडताळणी करावी.इसिस या दहशतवादी संघटनेने त्या व्हिडीओचा चुकीचा वापर केल्याचंही के.के शर्मा यांनी म्हटलं आहे

नवी दिल्ली, दि. 28- बीएसएफचे निलंबित जवान तेजबहादूर यादव यांनी जानेवारी महिन्यात जवानांना मिळणाऱ्या अन्नपदार्थाच्या खराब दर्जाबद्दल भाष्य करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तेजबहादूर यांच्या या व्हिडीओवर सर्वस्तरावर चर्चाही झाली. पण आता तेजबहादूर यांनी शेअर केलेल्या त्या व्हिडीओवर बीएसएफने स्पष्टीकरण दिलं आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना पुरवलं जाणारं अन्न चांगल्या दर्जाचे असून कोणीही याबद्दलची पडताळणी करावी, असं सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख के. के. शर्मा यांनी म्हटलं आहे. इसिस या दहशतवादी संघटनेने त्या व्हिडीओचा चुकीचा वापर केल्याचंही के.के शर्मा यांनी म्हटलं आहे. बीएसएफच्या जवानांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी इसिसने त्या व्हिडीओचा वापर केला, असंही त्यांनी म्हटलं. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

‘मी २००२ मध्ये बीएसएफमध्ये अतिरिक्त महासंचालक म्हणून रूजू झालो. मात्र तेव्हापासून एकाही जवानाने अन्नपदार्थाच्या दर्जाबद्दल तक्रार केलेली नाही. बदली किंवा पोस्टिंग यांच्याबद्दल काही समस्या असू शकतात. त्यामुळेच जेव्हा तेजबहादूर यादव यांनी अन्नपदार्थांच्या दर्जाबद्दल तक्रार करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला, तेव्हा मला धक्का बसला,’ असं बीएसएफ प्रमुख शर्मा म्हणाले. ‘बीएसएफच्या जवानांना अतिशय सकस आकार दिला जातो. याशिवाय खाद्यपदार्थांचा दर्जा नियमित तपासला जातो. त्यामुळे जेवणाबद्दल अजून कोणीही तक्रार केलेली नाही,’ असं शर्मा म्हणाले आहेत.

कोणीही कधीही सीमेवरील आमच्या कोणत्याही चौकीवर जाऊन बीसीएफ जवानांना मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा तपासावा, असं खुलं आव्हान के.के शर्मा यांनी दिलं. ‘तुम्ही कधीही कोणत्याही चौकीवर गेलात, तरीही जवानांना चांगल्या दर्जाचं अन्न मिळत असल्याचे तुम्हाला दिसेल. बीएसएफच्या जवानांना सकस आहार पुरेशा प्रमाणात दिला जातो,’ असंही त्यांनी सांगितलं.

तेजबहादूर यादव यांनी बीसीएफ जवानांना मिळणाऱ्या अन्नाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. सीमेवरील जवानांना अतिशय निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याचं यामध्ये त्यांनी म्हटलं होतं. यानंतर तेजबहादूर यादव यांची चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं. तेजबहादूर यादव यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओचा इसिसकडून गैरवापर करण्यात आल्याचं बीएसएफच्या प्रमुखांनी म्हटलं आहे.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दल