तेजबहादूरचा तो व्हिडीओ पाकिस्तानातून झाला व्हायरल

By admin | Published: June 2, 2017 01:53 PM2017-06-02T13:53:11+5:302017-06-02T14:22:45+5:30

. बीएसएफ जवानाने फेसबुकवर शेअर केलेला हा व्हिडिओ पाकिस्तानातील वेबसाइट्सने जास्त व्हायरल केल्याचा अहवाल इंटेलिजेन्स युनिटने दिला आहे.

The video of Tejabahadur came from Pakistan | तेजबहादूरचा तो व्हिडीओ पाकिस्तानातून झाला व्हायरल

तेजबहादूरचा तो व्हिडीओ पाकिस्तानातून झाला व्हायरल

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 2- लष्करातील जवानांना दिलं जाणाऱ्या अन्नाची दुरावस्था दाखविणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मध्यंतरी चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे लष्करावर खूप टीका झाली होती. बीएसएफ जवानाने फेसबुकवर शेअर केलेला हा व्हिडीओ पाकिस्तानातील वेबसाइट्सने जास्त व्हायरल केल्याचा अहवाल इंटेलिजेन्स युनिटने दिला आहे. बीएसएफमधील जवान तेजबहादूर यादव यांनी सैनिकांना दिलं जाणाऱ्या खराब प्रतीच्या जेवणाची माहिती सांगणार हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला होता. यामध्ये अत्यंत वाईट प्रतीचं जेवण दिलं जात असल्याची तक्रार तेजबहादूर यांनी केली होती. हा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केल्यानंतर पाकिस्तानातील काही वेबसाइट्सने तो जास्त पसरवला असल्याचं इंटेलिजेन्स युनिटने म्हंटलं आहे.
पाकिस्तानात असलेल्या 24 पैकी 21 वेबसाइट्सने तेजबहादूर यांचा व्हिडीओ जास्त प्रमाणात व्हायरल केल्याचं इंटेलिजेन्स युनिटने आपल्या अहवालात नमूद केलं आहे. "द हिंदू" या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. 
तेज बहादूर यांनी काही महिन्यांपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सीमेवरील जवनांना फक्त पाणी असलेली डाळ, जळलेली चपाती दिली जात असल्याची दृश्य दाखवली होती. भारत सरकार सर्व गोष्टी आम्हाला पुरवत असते परंतु काही अधिकारी भ्रष्टाचार करतात त्यामुळे आम्हाला चांगला आहार मिळत नाही असंही ते म्हणाले होते. त्यांच्या या व्हिडीओ नंतर खळबळ उडाली होती. 
गुरूवारी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जवानांना सावधगिरी बाळगायला सांगितली आहे. कोणताही व्हिडीओ व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर शेअर करू नका. या व्हिडीओच्या माध्यमातून शत्रूंकडून सोशल मीडियावर अफवा पसरविल्या जातात. बऱ्याचदा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून एखादा मेसेज किंवा व्हिडीओ सहजपणे फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपवर शेअर केला जातो. देशातील लोकांचा फायदा आहे असं भासविणाऱ्या गोष्टी त्या व्हिडीओमध्ये असतात. पण त्याची सत्यता तपासण्याआधी तसे व्हिडीओ शेअर करू नका. तुम्ही फक्त सीमेवरील सुरक्षेसाठी जबाबदार नाही आहात तर देशात शांतता टिकवणं ही तुमचं काम आहे, असं राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात बीएसएफच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. 
 

Web Title: The video of Tejabahadur came from Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.