भारतीय जवानांच्या हेल्पलाईनवर पाकमधून शिवीगाळ करणारे मेसेज

By admin | Published: March 5, 2017 09:51 PM2017-03-05T21:51:38+5:302017-03-05T21:51:38+5:30

भारतीय जवानांच्या मदतीसाठी २८ जानेवारी रोजी एक व्हॉट्सअप क्रमांक लॉन्च करण्यात आला आहे, त्यावर पाकिस्तानकडून शिवीगाळ करणारे मेसेज पाठवले जात असल्याचे समोर आले आहे

Shocking messages from the Indian on the helpline of the Indian soldiers | भारतीय जवानांच्या हेल्पलाईनवर पाकमधून शिवीगाळ करणारे मेसेज

भारतीय जवानांच्या हेल्पलाईनवर पाकमधून शिवीगाळ करणारे मेसेज

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - भारतीय जवानांच्या मदतीसाठी २८ जानेवारी रोजी एक व्हॉट्सअप क्रमांक लॉन्च करण्यात आला आहे, त्यावर पाकिस्तानकडून शिवीगाळ करणारे मेसेज पाठवले जात असल्याचे समोर आले आहे. जवानांनी आपल्या समस्या समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्याऐवजी त्या व्हॉट्सअपवर सांगाव्यात, या उद्देशाने हा क्रमांक जारी करण्यात आला होता. ९६४३३०००० हा व्हॉट्सअप क्रमांक जवानांच्या मदतीसाठी जारी केरण्यात आला आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आतापर्यंत 30 हजारांपेक्षा अधिक मेजेस हेल्पलाइवर आले आहेत. यामधिल बरेजसे मेसेज हे पाक मधून आले आहेत. पाकमधून आलेले मेसेज हे भारतविरोधी आणि लष्करविरोधी असून त्यामध्ये शिवीगाळ करण्यात आलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील सर्व मोबाईल क्रमांक ब्लॉक करण्यात आले आहेत. समोरुन पाठवले जाणारे मेसेज टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे
 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सीमा सुरक्षा दलाचे जवान तेजबहादूर यांनी सर्वात पहिला व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला होता. यामधून तेजबहादूर यांनी त्यांना मिळणाऱ्या जेवणाबद्दल तक्रार केली होती. सरकारकडून जेवणाच्या खर्चासाठी तरतूद केली जाते. मात्र आमचे वरिष्ठ अधिकारी त्यामध्ये घोटाळा करतात, असा आरोप तेजबहादूर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला होता. त्यानंतर इतर जवानांनीदेखील त्यांच्या तक्रारी समाज माध्यमांवर शेअर केल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शोषण करण्यात येत असल्याची तक्रारदेखील काही जवानांनी केली होती. यानंतर भारतीय लष्कराने जवानांना त्यांच्या समस्या मांडता याव्यात, यासाठी भारतीय लष्कराच्या मुख्यालयाकडून नंबर उपलब्ध करुन देण्यात आला होता. यानंतर समस्या समाज माध्यमांवर न मांडता थेट माझ्याकडे तक्रार करा, असे आवाहनदेखील लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी केले होते.

Web Title: Shocking messages from the Indian on the helpline of the Indian soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.