‘बीएसएफ’मध्ये दाखल होण्यास तरूण अनुत्सुक

By admin | Published: May 8, 2017 01:42 AM2017-05-08T01:42:50+5:302017-05-08T01:43:13+5:30

केंद्रीय निमलष्करी दलांमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता असताना आणि पाकिस्तानच्या वाढत्या कुरापतींमुळे सीमांवर अशांतता

Young unhealthy to join BSF | ‘बीएसएफ’मध्ये दाखल होण्यास तरूण अनुत्सुक

‘बीएसएफ’मध्ये दाखल होण्यास तरूण अनुत्सुक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्रीय निमलष्करी दलांमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता असताना आणि पाकिस्तानच्या वाढत्या कुरापतींमुळे सीमांवर अशांतता असताना स्पर्धा परीक्षेत निवड होऊनही तरुण सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ)मध्ये अधिकारी म्हणून दाखल होणयस अनुत्सुक असल्याचे चिंताजनक चित्र आहे.
गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतला तरी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये अन्य नागरी सेवा आणि अन्य निमलष्करी दले यांच्या तुलनेत ‘बीएसएफ’चे आकर्षण कमी झाल्याचे दिसते. निवड झाल्यावर रुजू होण्यास नकार दिला तर तो उमेदवार पुन्हा परीक्षा द्यायला कायमचा अपात्र ठरतो, असा नियम असूनही या नकार दिला जात असल्याने या तरुणांना मुळात या दलांमध्ये सेवा करण्याची इच्छा नाही, असेही म्हणता येईल.
केंद्रीय निमलष्करी दलांमधील अधिकाऱ्यांच्या पदांसाठी सन २०१५ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत पात्र ठरलेल्या २८ उमेदवारांची यंदा ‘बीएसएफ’मध्ये अधिकारी म्हणून निवड झाली. पण त्यापैकी १६ जणांनी निवड झालेल्या पदावर रुजू होण्यास नकार दिला.
त्याआधीच्या दोन वर्षांतही असाच रोख दिसून आला होता. सन २०१४ मध्ये झालेल्या परीक्षेत पात्र ठरलेल्या ज्या ३१ उमेदवारांची गेल्या वर्षी निवड झाली त्यांच्यापैकी १७ जमांनी प्रशिक्षणास जाण्यास नकार दिला होता. सन २०१३ मधील परीक्षेत पात्र ठरलेल्यांमधूनही गेल्या वर्षी ‘बीएसएफ’मध्ये अधिकारी नेमले गेले. त्या निवड झालेल्या ११० जणांपैकी फक्त ६९ रुजू झाले व नंतर आणखी १५ जणांनी प्रशिक्षण सुरु असताना राजीनामा दिला. अशा प्रकारे गेल्या तीन परीक्षांमध्ये निवड होऊनही ‘बीएसएफ’ला नकार देणाऱ्यांची एकूण संख्या ८६ आहे.
यापैकी बहुतांश उमेदवारांनी नागरी सेवांसाठी निवड होईल या आशेने परीक्षा दिली होती व निमलष्करी दलांपैकी त्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलास (सीआयएसएफ) प्रथम पसंती दिली होती. नकार देणाऱ्यांचा आढावा घेतला तर सैन्यदलांच्या तुलनेत निमलष्करी दलांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, सीमा भागांमध्ये खडतर परिस्थितीत जीव धोक्यात घालून करावी लागणारी नोेकरी आणि खास करून ‘बीएसएफ’मध्ये बढतीच्या कमी संधी ही कारणे प्रमुख दिसतात. शिवाय काही जणांनी ‘आयएसएस’ किंवा ‘आयपीएस’मध्ये निवड होईपर्यंतचा पर्याय म्हणून ही निमलष्करी दलांमधील अधिकारी भरतीची परीक्षा दिलेली होती.

५२२ पदे आहेत रिक्त

‘बीएसएफ’मध्ये जवानांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ठ अन्नाचा एक व्हिडिओ जेच बहादूर यादव या जवानाने अलीकडेच समाजमाध्यमांमध्ये टाकला होता. यावरून तेजबहादूरला बडतर्फ केले. पण ‘बीएसएफ’ला नकार देणाऱ्यांपैकी अनेकांनी आपल्या निर्णयास या व्हिडिओचाही संदर्भ असल्याचे सांगितले.
च्गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ‘सीएसएफ’मध्ये सहायक कमांडन्ट आणि त्यावरील राजपत्रित अधिकाऱ्यांची मंजूर पदसंस्था ५,३०९ आहे व त्यापैकी ५२२ पदे रिकामी आहेत.

नाखुश अधिकारी नकोतच!
याविषयी भाष्य करण्यास ‘बीएसएफ’च्या अधिकृत प्रवक्त्याने नकार दिला. मात्र या दलाचा एक अधिकारी म्हणाला, बीएसएफ, सीआरपीएफ आणि आयटीबीपी या दलांमधील सेवा खडतर असतात.
त्यापैकी बीएसएफ व सीआरपीएफ वाल्यांना तर युद्धसदृश स्थितीत काम करावे लागते. त्यामुळे अनेक उमेदवार या सेवांना पहिली पसंती देत नाहीत.
शिवाय या दलांना लष्करासारखा मानमरातब नसल्याने अनेक उमेदवार याकडे इतर सरकारी नोकऱ्यांपैकी एक म्हणून पाहतात. पण मनापासून तयारी नसलेल्यांनी बीएसएफमध्ये रुजू न होणे हे या दलासाठी चांगलेच म्हणावे लागेल.

Web Title: Young unhealthy to join BSF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.