पेट्रोलपेक्षा करच ‘महाग’; सात वर्षांत १३७ टक्क्यांनी वाढ, केंद्राचा वाटा सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 12:26 AM2021-02-27T00:26:35+5:302021-02-27T06:58:17+5:30

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आकाशाकडे झेपावू लागल्या आहेत.

Tax 'more expensive' than petrol; 137 per cent growth in seven years, the Central Goverment share is the highest | पेट्रोलपेक्षा करच ‘महाग’; सात वर्षांत १३७ टक्क्यांनी वाढ, केंद्राचा वाटा सर्वाधिक

पेट्रोलपेक्षा करच ‘महाग’; सात वर्षांत १३७ टक्क्यांनी वाढ, केंद्राचा वाटा सर्वाधिक

Next

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आकाशाकडे झेपावू लागल्या आहेत. देशात काही ठिकाणी तर पेट्रोलने शंभरीही गाठली. तर डिझेलचीही शतकाकडे झपाट्याने वाटचाल सुरू आहे. त्यात स्वयंपाकाचा गॅसही महागला आहे. सामान्यांच्या थेट खिशातच हात घातला जात असताना केंद्र सरकार मात्र मूग गिळून गप्प बसले आहे. उलटपक्षी इंधन दरवाढीसाठी मागच्या सरकारांना जबाबदार धरले जात आहे. असो. एक मात्र खरे की, इंधनाचे दर वाढत आहेत आणि त्यात मूळ पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी आणि करांचेच प्रमाण जास्त आहे.  पाहू या कसे ते... 

व्हॅटची आकारणी प्रत्येक राज्यात वेगवेगळी 

पेट्रोलियम मंत्रालयाच्या प्लॅनिंग अँड ॲनालिसिस सेल (पीपीएसी) संकेतस्थळानुसार पेट्रोलवरील कर संकलनासाठी राज्य सरकारे विविध पद्धती अवलंबतातत्यामुळे इंधन दरांवर आकारण्यात येणारा व्हॅट प्रत्येक राज्यात वेगवेगळा असतो .उदाहरणार्थ मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या महानगरांत किंचित अधिक प्रमाणात व्हॅट आकारणी केली जाते.त्यामुळे या तीनही ठिकाणी प्रतिलिटर पेट्रोलवर २६.८६ रुपये व्हॅट आकारला जातो.तर उर्वरित महाराष्ट्रात हेच प्रमाण २६.२२ रुपये एवढे आहे.

राज्य सरकारांच्या तुलनेत सद्य:स्थितीत केंद्र सरकार पेट्रोलवर अधिक प्रमाणात कर आकारत आहे .राज्य आणि केंद्र सरकार प्रतिलिटर पेट्रोलवर अनुक्रमे सरासरी २० आणि ३३ रुपये कर आकारतात.

प्रतिलिटर पेट्रोलच्या किमती आणि त्यावर लागणारे कर

मूळ किंमत  राज्याचा कर   केंद्रीय कर  डीलरचे कमिशन  एकूण किंमत

₹२९.७०      ₹२६.९०      ₹३३      ₹३.६९     ₹९३.२४
₹२९.७०    ₹२६.२०     ₹३३     ₹३.६९    ₹९२.६१
₹२९.७०     ₹२६     ₹३३     ₹३.६९    ₹९२.३६
₹२९.७०    ₹२५     ₹३३     ₹३.६९    ₹९२.४१
₹२९.७०     ₹२५    ₹३३     ₹३.६९    ₹९१.३८
₹२९.७०    ₹२४.७०     ₹३३     ₹३.६९    ₹९१.११
₹२९.७०     ₹२२.७०     ₹३३     ₹३.६९    ₹८९.११
₹२९.७०     ₹२२.७०     ₹३३     ₹३.६९    ₹८९.१०
₹२९.७०     ₹२२.५०     ₹३३     ₹३.६९    ₹८८.९७
₹२९.७०     ₹२०.६०     ₹३३     ₹३.६९    ₹८७.०३

 

Web Title: Tax 'more expensive' than petrol; 137 per cent growth in seven years, the Central Goverment share is the highest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.