तामिळनाडू : राजीव गांधींच्या मारेक-यावर वेल्लोर तुरूंगात हल्ला

By Admin | Updated: September 13, 2016 11:03 IST2016-09-13T10:50:27+5:302016-09-13T11:03:24+5:30

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मारेकरी पेरारीवलन याच्यावर तामिळनाडूतील वेल्लोर तुरूंगात सहकैद्याने हल्ला केला आहे.

Tamilnadu: Attack on Rajiv Gandhi's Marek-Vellore Prison | तामिळनाडू : राजीव गांधींच्या मारेक-यावर वेल्लोर तुरूंगात हल्ला

तामिळनाडू : राजीव गांधींच्या मारेक-यावर वेल्लोर तुरूंगात हल्ला

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. १३ - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मारेकरी पेरारीवलन याच्यावर तामिळनाडूतील वेल्लोर तुरूंगात सहकैद्याने हल्ला केला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली असून या घटनेत पेरारीवलन याच्या डोक्याल गंभीर इजा झाली असून ५-६ टाके घालण्यात आले आहेत. ' टाईम्स नाऊ' या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, पेरारीवालनला ज्या कोठडीत ठेवण्यात आले आहे तिथेच अपहरणाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राजेशलाही ठेवण्यात आले होते. आज सकाळी त्या दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले व त्याचे पर्यवसन मोठ्या वादात झाले. तुरूंग अधिका-यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी कोठडीत धाव घेत त्या दोघांचेही भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र संतापलेल्या राजेशने लोखंडी रॉडने पेरारीवलनला मारहाण केली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. अधिका-यांनी उपचारांसाठी त्याला तातडीने तुरूंगातील रुग्णालयात नेले, तेथे पेरारीवलनच्या डोक्याला ५ ते ६ टाके घालण्यात आले. 

Web Title: Tamilnadu: Attack on Rajiv Gandhi's Marek-Vellore Prison