शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

कुमारस्वामी सरकारवरील संकट टळता टळेना, काँग्रेसच्या बैठकीला चार आमदारांची दांडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 8:12 PM

कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेस-जेडीएस आणि विरोधी भाजपा यांच्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यामध्ये दररोज नवनवे अंक सादर होत आहेत.

ठळक मुद्देकर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेस-जेडीएस आणि विरोधी भाजपा यांच्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यामध्ये दररोज नवनवे अंक सादर होत आहेतकाँग्रेसने आज बोलावलेल्या बैठकीला चार आमदार गैरहजर बैठकीला चार आमदार अनुपस्थित राहिले. त्यामुळे राज्यातील काँग्रेसमध्ये सारे काही आलबेल नसल्याचेच समोर

बंगळुरू - कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेस-जेडीएस आणि विरोधी भाजपा यांच्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यामध्ये दररोज नवनवे अंक सादर होत आहेत. राज्यात सत्तांतर घडवून आणण्याचा भाजपाचा प्रयत्न हाणून पाडल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी करून काही तास उटलत नाहीत तोच पुन्हा एकदा उलथापालथीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, काँग्रेसने आज बोलावलेल्या बैठकीला चार आमदार गैरहजर राहिल्याने पुन्हा एकदा चर्चांना उत आला आहे. कर्नाटकमधील सत्तांतराचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी काँग्रेसने आज आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला चार आमदार अनुपस्थित राहिले. त्यामुळे राज्यातील काँग्रेसमध्ये सारे काही आलबेल नसल्याचेच समोर आले आहे. मात्र चार आमदार अनुपस्थित राहिले असले तरी राज्यातील कुमारस्वामी सरकारला सध्यातरी कुठल्याही स्वरूपाचा धोका नाही.दरम्यान, काँग्रेसचे नेते सिद्धारामय्या यांनी आज होणाऱ्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यास संबंधित आमदारांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. मात्र असे असतानाही रमेश जरकीहोळी, बी. नागेंद्र, उमेश जाधव आणि महेश कुमाहट्टी हे चार आमदार अनुपस्थित राहिले. रमेश जरकीहोळी यांना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळातील फेरबदलांमध्ये मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. तेव्हापासून ते प्रचंड नाराज आहेत.  

आज झालेल्या कर्नाटकमधील काँग्रेस आमदारांच्या बैठकीला मल्लिकार्जुन खर्गे,  सिद्धारामय्या, काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि राज्यातील इतर नेते उपस्थित होते. यावेळी राज्यातील सरकारला कुठलाही धोका नसल्याचे आणि भाजपा सरकार अस्थिर करण्याचे विनाकारण प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)BJPभाजपा