समुद्रावरील चिनी प्रभावाबाबत पावले उचलणार-पर्रीकर

By Admin | Updated: December 19, 2014 22:57 IST2014-12-19T22:57:04+5:302014-12-19T22:57:04+5:30

नवी दिल्ली-चीनच्या शेजारी देशांच्या समुद्री भागावर वाढत असलेल्या प्रभावाला रोखण्याच्या दृष्टीने भारताकडून लवकरच पावले उचलली जाणार असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोकसभेला सांगितले. तसेच नौदलाच्या आधुनिकीकरणाचे काम योग्यरीत्या सुरू असल्याची व पंतप्रधान मोदी यांच्या मेक इन इंडिया या अभियानांतर्गत स्वदेशी युद्ध यंत्रे विकसित करण्यावर भर दिला जात आहे अशी माहिती त्यांनी पुढे दिली.

Take action about the Chinese influence on the sea - Parrikar | समुद्रावरील चिनी प्रभावाबाबत पावले उचलणार-पर्रीकर

समुद्रावरील चिनी प्रभावाबाबत पावले उचलणार-पर्रीकर

ी दिल्ली-चीनच्या शेजारी देशांच्या समुद्री भागावर वाढत असलेल्या प्रभावाला रोखण्याच्या दृष्टीने भारताकडून लवकरच पावले उचलली जाणार असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोकसभेला सांगितले. तसेच नौदलाच्या आधुनिकीकरणाचे काम योग्यरीत्या सुरू असल्याची व पंतप्रधान मोदी यांच्या मेक इन इंडिया या अभियानांतर्गत स्वदेशी युद्ध यंत्रे विकसित करण्यावर भर दिला जात आहे अशी माहिती त्यांनी पुढे दिली.
पंतप्रधान मोदी यांनी काही शेजारी देशांना भेटी देऊन द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर भर दिल्याचे स्मरण करून देऊन सहा परंपरागत पाणबुड्यांची बांधणी सुरू असून अजून सहा बांधण्याची तयारी असल्याची माहिती पर्रीकर यांनी पुढे दिली.

Web Title: Take action about the Chinese influence on the sea - Parrikar