Sushma Swaraj Death : RIP Mother India; आनंद महिंद्रांनी अशी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 09:16 AM2019-08-07T09:16:14+5:302019-08-07T09:26:07+5:30

'महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा' उद्योग समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. RIP Mother India असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

Sushma Swaraj Death anand mahindra calls sushma swaraj mother india | Sushma Swaraj Death : RIP Mother India; आनंद महिंद्रांनी अशी वाहिली श्रद्धांजली

Sushma Swaraj Death : RIP Mother India; आनंद महिंद्रांनी अशी वाहिली श्रद्धांजली

Next
ठळक मुद्दे'महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा' उद्योग समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. RIP Mother India असं ट्वीट त्यांनी केलं आहे. 'RIP Mother India, तो दिवस तुम्ही पाहिलात मात्र आता आम्ही तुम्हाला कधीच पाहू शकणार नाही'

नवी दिल्ली - भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (67) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं आहे. सुषमा स्वराज यांना रात्री 9 च्या सुमारास एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपाच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती. सुषमा स्वराज मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्रमंत्री होत्या. एक ते दीड वर्षापूर्वी त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी त्यानंतर जाहीर केला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही महिन्यांपासून त्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या.

'महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा' उद्योग समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. RIP Mother India असं ट्वीट त्यांनी केलं आहे. मंगळवारी सुषमा स्वराज यांनी केलेल्या कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलेल्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये 'RIP Mother India, तो दिवस तुम्ही पाहिलात मात्र आता आम्ही तुम्हाला कधीच पाहू शकणार नाही' अशा शब्दांत आनंद महिंद्रा यांनी आदरांजली वाहिली आहे. 

काश्मीरबाबत केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर सुषमा स्वराज यांनी मंगळवारीच ट्विट केले होते की, पंतप्रधानजी, आपले हार्दिक अभिनंदन. मी माझ्या आयुष्यात हाच दिवस पाहण्याची प्रतीक्षा करीत होते. विशेष म्हणजे, या ट्विटनंतर काही तासांतच म्हणजेच रात्री साडेनऊ वाजता हृदयविकारामुळे सुषमा स्वराज यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना लगेच अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हर्ष वर्धन आणि भाजपच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांनी एम्समध्ये धाव घेतली. रात्री उशिरा एम्सने सुषमा स्वराज यांचं निधन झाल्याची माहिती दिली.

सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 रोजी हरयाणाच्या अंबालामध्ये (तेव्हाचे पंजाब) झाला. अंबालाच्या महाविद्यालयातून त्यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्रात पदवी मिळविली होती. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविली. 1973 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरूकेली. 1975 मध्ये त्यांचा विवाह स्वराज कौशल यांच्याशी झाला. बांसुरी ही त्यांची मुलगी. लंडनमध्ये ती वकिली करते.

सुषमा स्वराज यांच्या राजकीय कारकिर्दीत 1999मध्ये मोठी उलथापालथ झाली. त्यांना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींविरोधात कर्नाटकातल्या बेल्लारीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. भाजपानं जाणूनबुजून सोनिया गांधींविरोधात त्यांना उभं केलं होतं. त्याच्यामागेही एक कारण होतं. भाजपानं परदेशी सून आणि भारताची मुलगी अशी प्रचाराची रणनिती आखली होती. पण निवडणुकीत सुषमा स्वराज यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपाची ती रणनिती बेल्लारीच्या लोकांवर फार प्रभाव पाडू शकली नाही.  

नेतृत्व क्षमतेच्या जोरावर सुषमा स्वराज यांच्याकडे भाजपाच्या दुसऱ्या पिढीतील सर्वात वजनदार नेत्या म्हणून पाहिलं जात होतं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विदिशातून विजय मिळवला होता. त्यांची पत आणि भाजपासाठी दिलेलं योगदान लक्षात घेता मोदींनी त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं सोपवलं. इंदिरा गांधींनंतर सुषमा स्वराज या दुसऱ्या महिला परराष्ट्र मंत्री झाल्या. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयातही आपला वेगळा ठसा उमटवला.   

Web Title: Sushma Swaraj Death anand mahindra calls sushma swaraj mother india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.