सुशांतला जिवंतपणी मिळाली नाही त्यापेक्षा अधिक प्रसिद्धी मृत्यूनंतर मिळाली, ज्येष्ठ नेत्याच्या ट्विटमुळे राष्ट्रवादी अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 05:03 PM2020-08-12T17:03:46+5:302020-08-12T17:12:45+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजिद मेमन यांनी सुशांतसिंह राजपूतबाबत केलेल्या एका ट्विटमुळे राष्ट्र्रवादी काँग्रेस अडचणीत आली आहे.

Sushant got more publicity after his death than when he was alive - Majid Meman, NCP leader | सुशांतला जिवंतपणी मिळाली नाही त्यापेक्षा अधिक प्रसिद्धी मृत्यूनंतर मिळाली, ज्येष्ठ नेत्याच्या ट्विटमुळे राष्ट्रवादी अडचणीत

सुशांतला जिवंतपणी मिळाली नाही त्यापेक्षा अधिक प्रसिद्धी मृत्यूनंतर मिळाली, ज्येष्ठ नेत्याच्या ट्विटमुळे राष्ट्रवादी अडचणीत

Next

मुंबई - सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासाने आता पूर्णपणे राजकीय वळण घेतलं असून, या आत्महत्या प्रकरणावरून विविध राजकीय पक्षांचे नेते उलटसुलट विधाने करून या वादला रोज नवनवी वळणे देत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजिद मेमन यांनी सुशांतसिंह राजपूतबाबत केलेल्या एका ट्विटमुळे राष्ट्र्रवादी काँग्रेस अडचणीत आली आहे. सुशांतसिंह राजपूतला जिवंत असतानापेक्षा आता कैकपटीने प्रसिद्धी मिळत आहे, असे ट्विट माजिद मेमन यांनी केले होते. मात्र या ट्विटनंतर पक्षाला याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

माजिद मेमन यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला माध्यमांतून मिळत असलेल्या प्रसिद्धीबाबत आज दुपारी एक ट्विट केले. सुशांत सिंह राजपूत जिवंत असताना इतका प्रसिद्ध नव्हता, जितकी प्रसिद्धी त्याला मृत्यूनंतर मिळाली आहे. तसेच सध्या प्रसारमाध्यमांमध्ये त्याला इतकी प्रसिद्धी मिळत आहे तेवढी प्रसिद्धी आपल्या देशाचे पंतप्रधान आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतींनासुद्धा मिळत नसावी, असे मेमन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.



दरम्यान, या ट्विटवरून वाद वाढू लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यात ते म्हणाले की, माजिद मेमन यांचे विधान हे त्यांचे वैयक्तिक वक्तव्य आहे. त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही. त्यांनी ट्वीटरवर केलेली टिप्पणी त्यांचे वैयक्तिक मत आहे. ते पक्षाचे मत असू शकत नाही. या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्हाही प्रकारचा पाठिंबा देणार नाही. माजिद मेमन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. ही बाब सर्वांनी विचारात घ्यावी.



गेल्या दोन महिन्यांपासून सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण गाजत आहे. सुशांत सिंहचा मृतदेह १४ जून रोजी तो वास्तव्यास असलेल्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मिळाला होता. त्याने आत्महत्या केल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले होते. मात्र सुशांतसिंह राजपूत हा बिहारचा रहिवासी असल्याने बिहार सरकारने याबाबत सीबीआय तपासासाठी दबाव टाकला होता. त्यानंतर बिहार सरकारकडून सीबीआय तपासाबाबत शिफारस करण्यात आली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी केंद्र सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय तपासास तयार असल्याचे म्हटले होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

Web Title: Sushant got more publicity after his death than when he was alive - Majid Meman, NCP leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.