संघ मुख्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची डीजींकडून पाहणी

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:27+5:302014-12-18T22:39:27+5:30

नागपूर : दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या संघ मुख्यालयात सुरक्षेची व्यवस्था कशी आहे, त्याची पाहणी पोलीस महासंचालक (डीजी) संजीव दयाल यांनी केली.

Surveillance of the Sangh headquarter by the DG | संघ मुख्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची डीजींकडून पाहणी

संघ मुख्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची डीजींकडून पाहणी

गपूर : दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या संघ मुख्यालयात सुरक्षेची व्यवस्था कशी आहे, त्याची पाहणी पोलीस महासंचालक (डीजी) संजीव दयाल यांनी केली.
सिडनीतील ओलीस नाट्य आणि पाकिस्तानातील क्रूर तालिबानी हल्लयाच्या पार्श्वभूमीवर, सर्वत्र अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानातील हल्ल्यानंतर दहशतवादी सईद हाफिज याने या हल्ल्याला भारतच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. नागपूर हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. यापूर्वीही येथील संघ मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला आहे. या पार्श्वभूमीवर, नागपुरातील संवेदनशीलस्थळी पोलिसांचा बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. संघ मुख्यालयात १२ महिने कडक सुरक्षा व्यवस्था असते. येथे पोलिसांसोबत राज्य राखीव दलाची तुकडी आणि शीघ्र कृती दलाचे जवानही तैनात असतात. बंदोबस्ताच्या रचनेत वेळोवेळी फेरबदल केला जातो. महासंचालक दयाल यांनी सध्या येथील सुरक्षा व्यवस्था कशी आहे, ते पाहण्यासाठी बुधवारी संघ मुख्यालय आणि परिसराला भेट दिली. सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर त्यांनी त्यात काही बदलही सुचविल्याचे समजते. दरम्यान, डीजींच्या भेटीमुळे संघ मुख्यालयाला धमकी असल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. मात्र, तूर्त अशी कोणतीही धमकी नसून, विनाकारण अफवा पसरवू नये, असे आवाहनही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केले आहे.
-----

Web Title: Surveillance of the Sangh headquarter by the DG