शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

सर्जिकल स्ट्राइक्सचे श्रेय केवळ सैन्याचेच!

By admin | Updated: October 8, 2016 05:40 IST

सर्जिकल स्ट्राइक्सवरून, काँग्रेस आणि भाजप यांच्यात सध्या सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात काँग्रेसने आक्रमक राहण्याचा निर्णय घेतला

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- सर्जिकल स्ट्राइक्सवरून, काँग्रेस आणि भाजप यांच्यात सध्या सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात काँग्रेसने आक्रमक राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षश्रेष्ठींनी ज्येष्ठ नेत्यांना सांगितले आहे की, मोदी, त्यांचे मंत्री आणि भाजपवर चारही दिशांनी हल्ला करा आणि सर्जिकल आॅपरेशनचे नायकत्व मोदींना देण्याचा डाव हाणून पाडा. मोदींना श्रेय देताना भाजप प्रत्यक्षात जवानांच्या हौतात्म्याला दुय्यम लेखत असल्याचे लोकांना पटवून सांगण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. प्रसारमाध्यमातील मोठा भाग आपल्यासोबत नसून, तो आपल्या नेत्यांची विधाने चुकीचे संदर्भ देऊन सादर करीत असल्याची काँग्रेसची तक्रार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचे कार्यालयदेखील सक्रिय झाले आहे. त्याचे पहिले दर्शन राहुल यांचे टिष्ट्ववमुळे झाले. त्यात राहुल यांनी ते जे गुरुवारी बोलले होते, तेच भाषा बदलून सांगितले. प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनीही काँग्रेसने भारतीय सैन्याला सर्वोच्च सन्मान दिला आहे व देईलही. परंतु सैन्याने केलेल्या पराक्रमाचा वापर भाजप राजकीय लाभासाठी करीत असून आम्ही तो होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले आहे.पंजाब व उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी सर्जिकल आॅपरेशनच्या नावाखाली मोदी यांना नायकत्व बहाल करण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे, असा काँग्रेसचा आरोप आहे. उत्तर प्रदेशमध्ये ते सुरूच आहे. सर्जिकल स्ट्राइक्स करण्यात मोदी यांनी दाखविलेले धाडस आणि ५६ इंचांची छाती यांचा संबंध जोडणारी पोस्टर्स भाजपाने तिथे लावली आहे. काँग्रेसने अशा काही पोस्टरांचे व्हिडिओ जारी केले व ते पुढेही सुरूच ठेवायचे ठरविले आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकांची अधिसूचना जारी केल्यास या पोस्टरांचा आधार घेऊन त्याच्याकडे तक्रार करता येईल अशीही तयारी काँग्रेसने केलेली आहे. >राहुल गांधी जे काही म्हणाले त्यासोबत पक्ष कायम आहे व आम्ही तेदेखील सिद्ध करून दाखवू. ते विधान मागे घेऊन त्याबद्दल खेद व्यक्त करण्याचा तर प्रश्नच उद््भवत नाही कारण ते जे काही म्हणाले ते सत्य आहे, असेही सूरजेवाला म्हणाले.