श्रीनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश वाळूंज बिनविरोध
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:34+5:302015-02-18T00:13:34+5:30

श्रीनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश वाळूंज बिनविरोध
>लोणी-धामणी : खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील श्रीनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश तुकाराम वाळूंज यांची, तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर विठोबा भोजने यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ए. एम. घायाळ व सहनिवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय खराडे यांनी दिली. संचालक मंडळीची बैठक कार्यालात झाली. या वेळी बिनविरोध संचालक निवडण्यात आले, ते पुढीलप्रमाणे : संस्थापक संचालक उदय किसन डोके, संचालक ज्ञानेश्वर माऊली पोखरकर, दिलीप गवंडी, दत्तात्रय सुक्रे, तुळशीराम धुमाळ, जयश्री गायकवाड, वैशाली धुमाळ हे संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. खडकवाडी ग्रामस्थांनी सर्व बिनविरोध झालेल्या संचालकांचे अभिनंदन केले आहे.(अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे आय कार्ड फोटो पाठवीत आहे.)