स्मृती इराणींच्या संस्कृत प्रेमाला सुप्रीम कोर्टाचा चाप

By Admin | Updated: November 28, 2014 16:22 IST2014-11-28T16:22:35+5:302014-11-28T16:22:35+5:30

केंद्रीय महाविद्यालयामध्ये संस्कृत भाषेची सक्ती करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींना शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने दणका दिला.

Supreme Court's arc of Smriti Irani's Sanskrit Premaal | स्मृती इराणींच्या संस्कृत प्रेमाला सुप्रीम कोर्टाचा चाप

स्मृती इराणींच्या संस्कृत प्रेमाला सुप्रीम कोर्टाचा चाप

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २८  - केंद्रीय महाविद्यालयामध्ये संस्कृत भाषेची सक्ती करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींना शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने दणका दिला. केंद्रीय महाविद्यालयांमध्ये आठवीच्या विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा ऐच्छिक ठेवावी व जर्मन ही तिसरी भाषा म्हणून कायम ठेवावी असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. 
केंद्रीय महाविद्यालयांमध्ये जर्मन ऐवजी संस्कृत ही तिसरी भाषा करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला होता. मात्र शैक्षणिक वर्षाच्या मध्यात हा बदल होत असल्याने २२ पालकांनी  सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात शुक्रवारी सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला चालू शैक्षणिक वर्षात जर्मन ही तिसरी भाषा म्हणून ठेवावी असे निर्देश दिले.  यामुळे स्मृती इराणींच्या संस्कृत प्रेमाला सुप्रीम कोर्टाने चाप बसला आहे. 

Web Title: Supreme Court's arc of Smriti Irani's Sanskrit Premaal