शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

'ओटीटी'वर पॉर्नोग्राफी दाखवली जातेय, वेबसीरिजचे स्क्रीनिंग गरजेचे; सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 6:19 PM

केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसारित होणाऱ्या कंटेंटसंदर्भात नियमावली आणणार असल्याचे म्हटले आहे. यातच सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान ओटीटी दाखवण्यात येणाऱ्या कंटेंटबाबत चिंता व्यक्त केली आहे. (supreme court says even pornography is being shown on ott platforms some balance needed)

ठळक मुद्देओटीटी कंटेंटसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्तओटीटी प्लॅटफॉर्मवर पॉर्नोग्राफी दाखवली जातेय - सर्वोच्च न्यायालयओटीटीवर दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींचंही स्क्रीनिंग होणे गरजेचे - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : गेल्या काही कालावधीपासून ओटीटी म्हणजे  ‘ओव्हर द टॉप’चे प्रस्त वाढत चालले आहे. मात्र, त्यावर प्रसारित होणाऱ्या वेबसीरिज संदर्भात अनेक स्तरावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसारित होणाऱ्या कंटेंटसंदर्भात नियमावली आणणार असल्याचे म्हटले आहे. यातच सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान ओटीटी दाखवण्यात येणाऱ्या कंटेंटबाबत चिंता व्यक्त केली आहे. (supreme court says even pornography is being shown on ott platforms some balance needed)

सर्वोच्च न्यायालय ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भात केंद्र सरकारने तयार केलेली नियमावली पाहणार आहे. काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पॉर्नोग्राफी दाखवली जात आहे. ओटीटीवर दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींचंही स्क्रीनिंग होणे गरजेचे आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. अपर्णा यांच्या अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर न्यायालयामध्ये केवळ दोन मिनिटांची सुनावणी झाली.

Truecaller ने लॉन्च केले नवीन अॅप; आता व्यक्तीलाही ट्रॅक करता येणार

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अशोक भूषण यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींचेही स्क्रीनिंग व्हायला हवे, असे मत व्यक्त केले. ज्याप्रमाणे सेन्सॉर बोर्ड चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो पाहून त्यामधील बदल सुचवते, त्याचप्रमाणे ओटीटीवरील कंटेंटसाठीही अशा प्रकारचे प्रदर्शानापूर्वी स्क्रीनिंग झाले पाहिजे. हा कंटेंट दाखवण्याची परवानगी मिळाल्यावरच तो दाखवण्यात आला पाहिजे, याकडे सर्वोच्च न्यायालयाने लक्ष वेधले आहे. 

ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भात नियम नुकतेच जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणातील अर्जदार केवळ अ‍ॅमेझॉनच्या एक कर्मचारी आहेत. ही सीरियल बनवली, त्यांच्याविरोधात  गुन्हा दाखल केला पाहिजे. आमच्याविरोधात १० ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी भूमिका अपर्णा पुरोहित यांच्यावतीने विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी मांडली. याच भूमिकेवर भाष्य करताना न्या. भूषण यांनी ज्या गोष्टी ओटीटीवर दाखवल्या जातात, त्यामध्ये काही वेळेस पॉर्नोग्राफीही असते, असे मत नोंदवले. या याचिकेवरील सुनावणी आता पुढील शुक्रवारी होणार आहे. 

दरम्यान, अ‍ॅमेझॉन प्राईमवरील ‘तांडव’ या वेबसीरीजमुळे धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अपर्णा पुरोहित यांच्यासहीत अनेक कलाकार आणि निर्देशकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने अपर्णा पुरोहित यांची अटकपूर्व जामीनासंदर्भातील याचिका फेटाळली लावली. यानंतर अपर्णा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयamazonअ‍ॅमेझॉनNetflixनेटफ्लिक्स