शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांनी कामगारांना ओव्हरटाइमचे पैसे द्यावेत; गुजरात सरकारचा आदेश SCकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 16:20 IST

supreme court quashes gujarat govt notification तसेच सर्वोच्च न्यायालयाने 19 एप्रिल ते 20 जुलै या कालावधीत ओव्हरटाइमचे पैसे देण्याचे आदेश दिले आहेत.

कामगारांबाबत गुजरात सरकारने दिलेली अधिसूचना सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे. कामगारांना ओव्हरटाइम वेतन न देता अतिरिक्त कामे करावी लागतील, असं राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले होते. कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था आणखी बिकट झाली आहे, अशा परिस्थितीत मजुरांना वेळेत पगार न मिळणे यामागील एक कारण असू शकते. तसेच सर्वोच्च न्यायालयाने 19 एप्रिल ते 20 जुलै या कालावधीत ओव्हरटाइमचे पैसे देण्याचे आदेश दिले आहेत.न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले आहे की, कोरोना लॉकडाऊनदरम्यान कामगारांना तीव्र आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे कामगारांना आपले उदरनिर्वाहाच्या साधनांवर पाणी सोडावे लागत आहे. त्यातच हा कायदा जगण्याच्या आणि सक्तीच्या मजुरीच्या हक्कांच्या विरोधात वापरता येणार नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या 17 एप्रिलच्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, उद्योगांना लॉकडाऊनच्या कालावधीत कारखाना अधिनियमांतर्गत काही विशिष्ट अटींमधून सूट देण्यात आली. यात कामगारांना 6 तासांच्या अंतराने 30 मिनिटांचा ब्रेक देण्यात येणार असून, पुढील काम 6 तास केले जाईल. म्हणजेच मजुराला 12 तास काम करावे लागेल. अधिसूचनेत नमूद केले आहे की, त्याला मजुरीत केलेल्या जादा कामासाठीही केवळ सामान्य वेतन दिले जाईल. कारखाना कायद्याच्या कलमांन्वये ही अधिसूचना जारी करण्यात आली होती, ज्यायोगे सार्वजनिक आणीबाणीच्या वेळी सरकार कारखान्यांना कारखाना कायद्याच्या कक्षेतून मुक्त करू शकते.या कलमानुसार, सार्वजनिक आणीबाणीचा अर्थ गंभीर आपत्कालीन परिस्थिती आहे, जी युद्ध किंवा बाह्य आक्रमकता किंवा अंतर्गत गडबड असो की भारताची सुरक्षा धोक्यात आणते. कोर्टाने म्हटले आहे की सरकार कलमांन्वये उद्योगांना सूट देऊ शकत नाही, कारण साथीच्या रोगाला सार्वजनिक आपात्कालीन परिस्थिती मानले जाऊ शकत नाही. तसेच 20 एप्रिल ते 19 जुलै या कालावधीत सर्व मजुरांना त्यांचे ओव्हरटाइम वेतन द्यावे, असेही कोर्टाने निर्देश दिले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGujaratगुजरात