शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

अच्युतानंदन यांची याचिका फेटाळली सुप्रीम कोर्ट : पुरावे कनिष्ठ न्यायालयाला द्या

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

नवी दिल्ली : पामोलीन तेल आयात घोटाळ्याप्रकरणी केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांची याचिका सवार्ेच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली आहे. १९९१ मध्ये केरळात काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार असताना पामोलीन तेलाच्या आयातीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले.

नवी दिल्ली : पामोलीन तेल आयात घोटाळ्याप्रकरणी केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांची याचिका सवार्ेच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली आहे. १९९१ मध्ये केरळात काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार असताना पामोलीन तेलाच्या आयातीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले.
अच्युतानंदन यांनी आपली बाजू मांडण्यासाठी संबंधित पुरावे कनिष्ठ न्यायालयात सादर करावेत, असा आदेशही टी. एस. ठाकूर आणि आदर्शकुमार गोयल यांच्या खंडपीठानेे दिला. तुम्ही या प्रकरणाचा राजकीय लाभ घेण्यासाठी आरोप करीत असून त्याला कोणताही आधार नाही. केवळ राजकीय लाभ घेण्यासाठी तुम्ही खटल्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत आहात, असे सांगत न्यायाधीशांनी अच्युतानंदन यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले.
याबाबत काही पुरावे असल्यास ते कनिष्ठ न्यायालयासमोर मांडता येतील. या प्रकरणी सवार्ेच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मताचा कोणताही प्रभाव पडू न देता कनिष्ठ न्यायालयाने विचार करावा, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
------------------
चंडी यांचे नाव का नाही?
अच्युतानंदन हे मुख्यमंत्री असताना सध्या काँग्रेसमध्ये असलेले वरिष्ठ नेते ओमेन चंडी हे अर्थमंत्री होते. त्यांचे नाव आरोपपत्रात नाही. एवढेच नव्हे, तर नव्या तपासातही त्यांना क्लीन चिट देण्यात आले, याकडे अच्युतानंदन यांचे वकील शेखर नाफडे यांनी लक्ष वेधले. चंडी यांचे नाव वगळण्यासाठी लावलेले निकष अच्युतानंदन यांच्यासाठी का नाहीत, असा सवालही त्यांनी केला.