शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील परिस्थितीबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून मागवले स्पष्टीकरण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 12:55 IST

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दाखल झालेल्या विविध याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

नवी दिल्ली - कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दाखल झालेल्या विविध याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि जम्मू काश्मीर सरकारकडून स्पष्टीकरण मागवले आहे. काश्मीरमधील परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांच्या  केंद्र सरकारला दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. 

जम्मू काश्मीरमध्ये सामान्य परिस्थिती पुनर्स्थापित करण्यासाठी पावले उचण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि जम्मू काश्मीर सरकारला दिले आहेत. तसेच यासाठी पावले उचलताना राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण याबाबत योग्यती काळजी घेण्यात यावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. 

कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयासोबतच नॅशनल काँन्फ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्या नजरकैदेविरोधातही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. तामिळनाडूमधील नेते वायको यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ३० सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. 

 फारुख अब्दुल्ला यांच्या नजरकैदेबाबत केंद्र सरकारकडून वेगवेगळे तर्क दिले आहेत. पब्लिक सेफ्टी अॅक्ट अंतर्गत अब्दुल्ला यांना नजर कैदेत ठेवण्यात आले असल्याचे सरकारने कोर्टात सांगितले होते. दरम्यान, यासंदर्भातील वायकोंच्या याचिकेनंतर कोर्टाने केंद्राला नोटीस पाठवली आहे.   सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अॅटॉर्नी जनरल यांना विचारले की, नेमक्या कुठल्या कारणामुळे तुम्ही काश्मीरमधून वृत्तपत्रे प्रकाशित होत असल्याचे सांगितले? तसेच काश्मीर खोऱ्यात अद्यापही इंटरनेट आणि फोनसेवा आतापर्यंत का बंद आहे. काश्मीर खोऱ्यातील कम्युनिकेशन का बंद करण्यात आले आहे? असा सवालही न्यायमूर्तींनी अॅटॉर्नी जनरल यांना केला. तसेच या प्रकरणी दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारArticle 370कलम 370