शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

कुरेशी समाजाचे धरणे आंदोलन विविध पक्ष-संघटनांचा पाठिंबा

By admin | Updated: February 13, 2015 00:49 IST

लातूर : लातूर जिल्‘ातील लहान-मोठ्या कत्तलखान्यांचे आधुनिकीकरण, कुरेशी समाजाला जातीचे प्रमाणपत्र, गोवंश हत्याबंदी विधेयक बिल तात्काळ रद्द करावे, यासह काही संघटनांकडून होणारा त्रास थांबविण्यात यावा, या मागणीसाठी लातूर जिल्हा जमिअतुल कुरैशच्या वतीने गांधी चौकात गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला.

लातूर : लातूर जिल्‘ातील लहान-मोठ्या कत्तलखान्यांचे आधुनिकीकरण, कुरेशी समाजाला जातीचे प्रमाणपत्र, गोवंश हत्याबंदी विधेयक बिल तात्काळ रद्द करावे, यासह काही संघटनांकडून होणारा त्रास थांबविण्यात यावा, या मागणीसाठी लातूर जिल्हा जमिअतुल कुरैशच्या वतीने गांधी चौकात गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला. प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने जाणीवपूर्वक काही समाजकंटकांकडून बाजारात त्रास दिला जात आहे. जनावरे खरेदी केल्यावर वाहतूक करण्यासाठी अडवणूक केली जाते. पोलिसात खोट्या तक्रारी दिल्या जातात. मारहाण केली जाते. पैसे काढून घेतले जातात, असे प्रकार सर्रासपणे वाढत असल्याने कुरेशी समाजाने ५ फेब्रुवारीपासून बेमुदत कत्तलखाने बंद केले आहेत. सवार्ेच्च न्यायालयाने आदेश देऊनही कत्तलखान्यांचे आधुनिकीकरण केले जात नाही. सत्ताबदल झाल्याने जातीयवादी अतिउत्साही संघटनांनी उच्छाद मांडला आहे. प्रशासन गप्प आहे. जनावरांची वाहने अडवून खंडणी मागण्याचे प्रकार घडत आहेत. आतापर्यंत दोनशे जनावरे परत मिळालेली नाहीत, असा आरोप आंदोलकांनी केला. न्यायमूर्ती सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा समितीच्या शिफारशी लागू करून मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे, खाटिक समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, हिंदू खाटिकप्रमाणे मुस्लिम कुरेशी (खाटिक) समाजाला सवलती देण्यात याव्यात, आदी मागण्या जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. तर त्यांचा आम्हीच बंदोबस्त करू... जमिअतुल कुरैशच्या आंदोलनाला लातूर, औसा, देवणी, निलंगा, जळकोट, उदगीर, रेणापूर, अहमदपूर, चाकूर आदी भागातून पाठिंबा मिळाला. यावेळी महापौर अख्तर शेख, भाजपाचे मोहन माने, रिपाइंचे चंद्रकांत चिकटे, मिलिंद महालिंगे, प्रा. अनंत लांडगे, लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड. आण्णाराव पाटील, महाराष्ट्र विकास आघाडीचे बसवंतअप्पा उबाळे, ब्लू पँथरचे अध्यक्ष साधू गायकवाड, लष्कर-ए-भिमाचे रणधीर सुरवसे, मिलिंद कांबळे, मुस्लिम क्रांती सेनेचे हमिदखाँ पठाण, मोटारमालक संघाचे अध्यक्ष सय्यद ताजोद्दीनबाबा आदींची भाषणे झाली. हिंदू खाटिक राज्य मागासवर्गीय सामाजिक संघटनेचे अध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, ॲड. प्रदीपसिंह गंगणे, मुव्हमेंट पीस फॉर जस्टिस, लातूर जिल्हा चिकन व्यापारी असोसिएशन, स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषद, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट आदी संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी हाफी इब्राहीम कुरेशी, अफजल कुरेशी, अफसर कुरेशी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.