शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

सुखोईला अपघात ही मानवी चूक- रशियाचा दावा वायुदलाचा मात्र इन्कार : अद्याप अंतिम निष्कर्ष नाही

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

बंगळुरू : भारतात सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमान कोसळण्याची घटना मानवी चुकीमुळे घडल्याचा दावा रशियाच्या इरकुट कॉपार्ेरेशनचे उपाध्यक्ष व्हिटाली बोरोडिक यांनी केला असून भारतीय वायुदलाने त्याचा इन्कार केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुखोई कोसळल्यानंतर भारताने या विमानांच्या संपूर्ण ताफ्याचा वापर एक महिन्यासाठी थांबविला होता.

बंगळुरू : भारतात सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमान कोसळण्याची घटना मानवी चुकीमुळे घडल्याचा दावा रशियाच्या इरकुट कॉपार्ेरेशनचे उपाध्यक्ष व्हिटाली बोरोडिक यांनी केला असून भारतीय वायुदलाने त्याचा इन्कार केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुखोई कोसळल्यानंतर भारताने या विमानांच्या संपूर्ण ताफ्याचा वापर एक महिन्यासाठी थांबविला होता.
मानवी चुकीमुळेच अपघात घडल्याची आमची भूमिका आहे. भारतीय वायुदलाने ही चूक मान्य केली आहे. त्यामुळेच हे विमान अजूनही सेवेत आहे, असे ते म्हणाले. प्रत्यक्षात भारताने हा दावा मान्य केलेला नाही, हे उल्लेखनीय.
इरकुट ही रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉपार्ेरेशन या सरकारी कंपनीची उपशाखा आहे.
भारतीय वायुदलाने या अपघाताबद्दल कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले असून अद्याप अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. विमानातील इंजेक्शन सीटच्या समस्येमुळे हा अपघात झाल्याची माहिती वायुदलप्रमुख अरूप राहा यांनी दिली होती.
------------------------------
मेक इन इंडियाला रशियाचे समर्थन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नारा दिल्याबद्दल रोस्टेक या रशियन सरकारी कंपनीने जोरदार समर्थन केले आहे. नागरी आणि संरक्षण क्षेत्रात विकास, उत्पादन आणि उच्च तंत्रज्ञानयुक्त औद्योगिक उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे काम ही कंपनी करते. भारताने अमेरिकेकडून उत्पादने खरेदी केल्यामुळे आमचे भारतासोबतचे संबंध बिघडणार नाहीत. आम्ही कोणत्याही देशाला अन्य देशांची उत्पादने खरेदी करण्याला अटकाव घालत नाही. अमेरिकेचे मात्र तसे नाही, असे या कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने स्पष्ट केले.
---------------------------
सुखोई आता ब्रह्मोसने सुसज्ज
ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त गती असलेले ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडलेले एकात्म सुखोई- ३० लढाऊ विमान एचएएल या भारतीय कंपनीने गुरुवारी वायुदलाच्या सुपूर्द केले. ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडल्यामुळे हे विमान अतिशय घातक शस्त्रांनी सुसज्ज झाले असल्याचे एचएएलचे अध्यक्ष टी सुवर्णा राजू यांनी स्पष्ट केले. या कंपनीच्या अंतर्गत डिझाईन चमूने ब्रह्मोसच्या एकत्रीकरणाचे काम चोखपणे पार पाडले. येथे हवाईदलाच्या येलहंका तळावर एअरो शोच्या वेळी ते वायुदलाच्या सुपूर्द करण्यात आले.