शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

सुखोईला अपघात ही मानवी चूक- रशियाचा दावा वायुदलाचा मात्र इन्कार : अद्याप अंतिम निष्कर्ष नाही

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

बेंगळुरू : भारतात सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमान कोसळण्याची घटना मानवी चुकीमुळे घडल्याचा दावा रशियाच्या इरकुट कॉपार्ेरेशनचे उपाध्यक्ष व्हिटाली बोरोडिक यांनी केला असून भारतीय वायुदलाने त्याचा इन्कार केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुखोई कोसळल्यानंतर भारताने या विमानांच्या संपूर्ण ताफ्याचा वापर एक महिन्यासाठी थांबविला होता.

बेंगळुरू : भारतात सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमान कोसळण्याची घटना मानवी चुकीमुळे घडल्याचा दावा रशियाच्या इरकुट कॉपार्ेरेशनचे उपाध्यक्ष व्हिटाली बोरोडिक यांनी केला असून भारतीय वायुदलाने त्याचा इन्कार केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुखोई कोसळल्यानंतर भारताने या विमानांच्या संपूर्ण ताफ्याचा वापर एक महिन्यासाठी थांबविला होता.
मानवी चुकीमुळेच अपघात घडल्याची आमची भूमिका आहे. भारतीय वायुदलाने ही चूक मान्य केली आहे. त्यामुळेच हे विमान अजूनही सेवेत आहे, असे ते म्हणाले. प्रत्यक्षात भारताने हा दावा मान्य केलेला नाही, हे उल्लेखनीय.
इरकुट ही रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कापार्ेरेशन या सरकारी कंपनीची उपशाखा आहे.
भारतीय वायुदलाने या अपघाताबद्दल कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले असून अद्याप अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. विमानातील इंजेक्शन सीटच्या समस्येमुळे हा अपघात झाल्याची माहिती वायुदलप्रमुख अरूप राहा यांनी दिली होती.
------------------------------
मेक-इन-इंडियाला रशियाचे समर्थन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक- इन- इंडियाचा नारा दिल्याबद्दल रोस्टेक या रशियन सरकारी कंपनीने जोरदार समर्थन केले आहे. नागरी आणि संरक्षण क्षेत्रात विकास, उत्पादन आणि उच्च तंत्रज्ञानयुक्त औद्योगिक उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे काम ही कंपनी करते. भारताने अमेरिकेकडून उत्पादने खरेदी केल्यामुळे आमचे भारतासोबतचे संबंध बिघडणार नाहीत. आम्ही कोणत्याही देशाला अन्य देशांची उत्पादने खरेदी करण्याला अटकाव घालत नाही. अमेरिकेचे मात्र तसे नाही, असे या कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
---------------------------
सुखोई आता ब्रह्मोसने सुसज्ज
ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त गती असलेले ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडलेले एकात्म सुखोई- ३० लढाऊ विमान एचएएल या भारतीय कंपनीने गुरुवारी वायुदलाच्या सुपूर्द केले. ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडल्यामुळे हे विमान अतिशय घातक शस्त्रांनी सुसज्ज झाले असल्याचे एचएएलचे अध्यक्ष टी सुवर्णा राजू यांनी स्पष्ट केले. या कंपनीच्या अंतर्गत डिझाईन चमूने ब्रह्मोसच्या एकत्रीकरणाचे काम चोखपणे पार पाडले. येथे हवाईदलाच्या येलहंका तळावर एअरो शो च्या वेळी ते वायुदलाच्या सुपूर्द करण्यात आले.