ग्रामीण हॅलो पान २ साठी सारांश प˜ा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:36+5:302015-08-03T22:26:36+5:30

केम परिसरात गूढ आवाजाने नागरिक घाबरले

Summary address for Village Hello page 2 | ग्रामीण हॅलो पान २ साठी सारांश प˜ा

ग्रामीण हॅलो पान २ साठी सारांश प˜ा

म परिसरात गूढ आवाजाने नागरिक घाबरले
केम : केम (ता़ करमाळा)सह मलवडी, पाथुर्डी, घोटी, वडशिंगे, सातोली आदी परिसरात सोमवारी सकाळी १०़४५ वाजता अचानक मोठा आवाज झाला़ या गूढ आवाजामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती़ सकाळी जि़ प़ शाळेत प्रार्थना सुरू होती़ या आवाजाने विद्यार्थी भयभीत झाले़ या आवाजाबाबत सर्वत्र एकमेकांना विचारणा सुरू झाली होती़
हसापूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
अक्कलकोट : तालुक्यातील हसापूर येथे स्व़ उमेश इंगळे मित्रमंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा माजी नगराध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ यावेळी सरपंच इमामबी शेख, इब्राहिम शेख, ग्रामपंचायत सदस्य पंचप्पा स्वामी, संजय जाधव, सदानंद घटकांबळे, शरणप्पा स्वामी, मथुराबाई शिंदे, हुसेनी शेख, राजू फणसे, रामलिंगप्पा स्वामी आदी उपस्थित होते़
अनिता नंदीवाले हिचे यश
वरवडे : माढा तालुक्यातील वरवडे येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयातील अनिता नंदीवाले हिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविल्याबद्दल प्राचार्य साहेबराव लेंडवे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला़ यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भाई एस़ एम़ पाटील, आऱ आऱ ढोले, डी़ एम़ म्हेत्रे, करले यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते़

Web Title: Summary address for Village Hello page 2