शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाची गळफास लावून आत्महत्या भावसार मढीतील घटना : दरवाजा तोडून काढला मृतदेह बाहेर

By admin | Updated: March 18, 2016 22:25 IST

जळगाव: भावसार मढीत राहणार्‍या भूषण सुभाष बारी (वय ३४) या तरुणाने शुक्रवारी दुपारी राहत्या घरी वरच्या मजल्यावर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दरवाजा तोडून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबत शनी पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

जळगाव: भावसार मढीत राहणार्‍या भूषण सुभाष बारी (वय ३४) या तरुणाने शुक्रवारी दुपारी राहत्या घरी वरच्या मजल्यावर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दरवाजा तोडून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबत शनी पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
शुक्रवारी दुपारी दोन वाजता भूषण हा नेहमी प्रमाणे वरच्या मजल्यावर झोपायला गेला होता.यावेळी आई बाहेर तर वडील कामावर गेले होते.संध्याकाळी साडे पाच वाजले तरी मुलगा उठला नाही, म्हणून आई राधाबाई या त्याला उठविण्यासाठी वरच्या मजल्यावर गेल्या असता दरवाजा आतून बंद होता. खिडकीतून डोकावून पाहिले तर पत्र्याच्या लोखंडी पाईला दोरी बांधून त्याने गळफास घेतल्याचे दिसले.पत्र्याच्या छताची उंची कमी असल्याने गुडघ्यापासून पाय वाकवून त्याने आत्महत्या केली आहे.
इन्फो
आईने मारली किंकाळी
मुलगा भूषण याने आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यानंतर आईने जोरात किंकाळी मारली. त्यांच्या या आवाजामुळे गल्लीतील तरुण धावत गेले. राधाबाई यांना सावरत त्यांनी दरवाजा तोडला. यावेळी लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना कळविली. पोलीस येईपर्यंत सुन्न अवस्थेत त्या मुलाच्या प्रेताजवळ बसून होत्या. तरुणांनी त्यांना जबरदस्तीने खाली आणले. तेथे त्यांचा होणारा प्रचंड आक्रोश उपस्थितांचा मन हेलावणारा होता.
दोन बहिणींचा एकुलता भाऊ
भूषण हा दोन बहिणींचा एकुलता एक मोठा भाऊ होता. दोघी बहिणी विवाहित असून अश्विनी हिला शिरसोली तर सपनाला अंतुर्ली ता.मुक्ताईनगर येथे दिले आहे. वडील टेक्सटाईलच्या दुकानावर कामाला आहेत तर आई गृहिणी आहे. भूषण स्वत: सीसीटीव्ही व क्वॉईन बॉक्स फोन दुरुस्तीचे काम करायचा. सकाळी वडील कामावर जाताना त्यांच्याशी तो चांगला बोललाही होता.
इन्फो
गुरुवारी लग्नासाठी पाहिली होती मुलगी
यंदा त्याचा विवाह करायाचा निर्णय कुटुंबाने घेतला होता.त्यासाठी लग्नाचे स्थळ पाहण्याचे सुरू होते. गुरुवारी तो एका ठिकाणी मुलगी पाहून आला होता,असे असतानाच त्याने अचानक आत्महत्या केल्यामुळे बारी कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.
मृतदेहाजवळ होती बाहुली
भूषणचा मृतदेह खाली उतरवला असता गादीजवळ सजवलेली बाहुली होती. त्यावर गोधडी टाकली होती.तर मोबाईल एअरमोडवर ठेवला होता. सकाळी ६.३५ वाजता त्याला एक फोन आला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविला.