"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 14:44 IST2025-10-03T14:43:17+5:302025-10-03T14:44:24+5:30
७५ वर्षीय संगरु राम आणि ३५ वर्षीय महिलेच्या लग्नाची चर्चा रंगली होती. लग्नानंतर काही तासांतच संगरु यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसराला धक्का बसला.

"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील कुछमुछ गावातील ७५ वर्षीय संगरु राम आणि ३५ वर्षीय महिलेच्या लग्नाची चर्चा रंगली होती. लग्नानंतर काही तासांतच संगरु यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसराला धक्का बसला. त्यांची पत्नी मनभावतीने नेमकं काय घ़डलं हे सांगितलं आहे. मनभावती म्हणाल्या की, "हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते फक्त माझ्याशी बोलत होते."
"लग्न आणि मुलांच्या भविष्यातील योजनांबद्दल बोलत होते. पण कोणाला माहित होतं की सकाळी सर्व काही संपेल. सकाळी अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्याआधीच सर्व काही संपलं." गौराबादशाहपूरचे स्टेशन प्रभारी प्रवीण यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमार्टम रिपोर्टवरून स्पष्टपणे दिसून येतं की, संगरु रामचा मृत्यू शॉक/कोमामुळे झाला. तो नैसर्गिक मृत्यू होता. काहीही संशयास्पद आढळलं नाही.
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
कुछमुछ गावातील रहिवासी संगरु राम यांच्या पत्नीचं एक वर्षापूर्वीच निधन झालं. त्यांना मुलं नव्हती. बराच काळ ते एकटेच राहत होते, शेती करत होते. आधार मिळवण्यासाठी पुन्हा लग्न करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी जलालपूर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी मनभावतीशी लग्न केलं. मनभावतीचं हे दुसरं लग्न होतं, पहिल्या लग्नापासून त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता.
"मी लग्नासाठी तयार नव्हते. पण मला खात्री होती की संगरु राम माझ्या मुलांची पुढे नीट काळजी घेतील. त्यांनी तसं मला आश्वासन दिलं असल्याने मी या लग्नासाठी होकार दिला होता" असं मनभावतीने म्हटलं. सोमवारी लग्न झाल्यानंतर संगरु यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.