शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

ऊस तोडणी, वाहतुकीसाठी अनामत 3 लाख बबनराव शिंदे: विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा उपक्रम

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

टेंभुर्णी: विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सन 2015-16 हंगामासाठी गाळप क्षमतेएवढी र्मयादित ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा भरती करण्यात येणार आहे. त्यांना ऊस तोडणी वाहतुकीसाठी प्रति वाहन 3 लाख रूपये अनामत वाटप करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष आ. बबनराव शिंदे यांनी सांगितले.

टेंभुर्णी: विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सन 2015-16 हंगामासाठी गाळप क्षमतेएवढी र्मयादित ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा भरती करण्यात येणार आहे. त्यांना ऊस तोडणी वाहतुकीसाठी प्रति वाहन 3 लाख रूपये अनामत वाटप करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष आ. बबनराव शिंदे यांनी सांगितले.
कारखाना कार्यस्थळावर ऊस तोडणी, वाहतूक कंत्राटदारांची बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. चालू होणार्‍या गाळप हंगामात र्मयादित ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा भरती करण्यात येणार आहे. मागील हंगामामध्ये मराठवाड्यामध्ये दुष्काळी स्थिती असल्याने मोठय़ा प्रमाणात ऊस तोडणी मजूर कामासाठी आल्याने अतिरिक्त ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा कामावर हजर होती, असेही आ. शिंदे यांनी सांगितले.
2015-16 हंगामामध्ये कारखान्याने 22 लाख मे. टन ऊस गळिताचे उद्दिष्ट ठेवले असून, गाळप क्षमतेएवढा ऊस पुरवठा होण्यासाठी आवश्यक तेवढी ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा भरती करण्यात येणार असून, यासाठी 3 लाख रूपये अनामत देण्यात येणार आहे. यामध्ये पहिला हप्ता दीड लाख, दुसरा एक लाख, अंतिम हप्ता 50 हजार देण्यात येणार आहे, असेही आ. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी कार्यकारी संचालक आर. एस. रणवरे, मुख्य शेतकरी अधिकारी एस. पी. थिटे, मुख्य ऊस विकास अधिकारी एम. आर. भादुले, शेतकरी अधिकारी एस. एस. बंडगर उपस्थित होते.
आरोग्यासाठी संचित निधी
ऊस तोडणी, वाहतूक कंत्राटदार, तोडणी मजूर, चालकांना अपघात, सर्पदंश झाल्यास दवाखाना खर्चासाठी व मयत झाल्यास वारसांना मदत करण्यासाठी आपत्कालीन निधी संचित करण्यात येणार आहे. ऊस तोडणी वाहतुकीचे करार 15 जुलैनंतर सुरू करण्यात येणार असल्याचे आ. बबनराव शिंदे यांनी सांगितले.