शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वी-२ ची यशस्वी चाचणी

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

बालेश्वर : भारताने गुरुवारी स्वदेशी बनावटीच्या आणि अण्वस्त्रवाहू पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली़ ओडिशाच्या चांदीपूरस्थित एकात्मिक चाचणी तळा (आयटीआर)वर सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी ही यशस्वी चाचणी घेण्यात आली़

बालेश्वर : भारताने गुरुवारी स्वदेशी बनावटीच्या आणि अण्वस्त्रवाहू पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली़ ओडिशाच्या चांदीपूरस्थित एकात्मिक चाचणी तळा (आयटीआर)वर सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी ही यशस्वी चाचणी घेण्यात आली़
जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र ३५० कि.मी.पर्यंतचा अचूक लक्ष्यभेद करू शकतो़ द्रव इंधनावर चालणार्‍या दोन इंजिनांचा समावेश असलेले पृथ्वी-२ आपल्यासोबत ५०० ते १००० किलोग्रॅमपर्यंतची आयुधे वाहून नेण्यास सक्षम आहे़ आयटीआरचे संचालक एमव्हीकेव्ही प्रसाद यांनी ही चाचणी पूर्णत: यशस्वी राहिल्याचे सांगितले़
संरक्षण सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सन २००३ पासून पृथ्वी-२ लष्कराच्या सेवेत आहे़ लष्करासाठी तयार केल्या जात असलेल्या क्षेपणास्त्रांपैकी एखाद्या क्षेपणास्त्राची अचानक निवड करून त्याची चाचणी केली जाते़ आजची पृथ्वी-२ ची चाचणी याच स्वरूपाची होती़ अशा चाचणीद्वारे क्षेपणास्त्राची गुणवत्ता तपासली जाते़ (वृत्तसंस्था)