शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

जी-सॅट-१६ चे यशस्वी प्रक्षेपण

By admin | Updated: December 8, 2014 01:58 IST

दळणवळण सेवांमध्ये भर टाकण्यासोबतच देशाच्या अंतराळ क्षमतावाढीच्या दृष्टीने भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे़ फ्रेंच गुयानाच्या कोरू प्रक्षेपण तळावरून रविवारी पहाटे

बंगळुरू: दळणवळण सेवांमध्ये भर टाकण्यासोबतच देशाच्या अंतराळ क्षमतावाढीच्या दृष्टीने भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे़ फ्रेंच गुयानाच्या कोरू प्रक्षेपण तळावरून रविवारी पहाटे भारताच्या जीसॅट-१६ या दळणवळण उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले़खराब हवामानामुळे गत दोन दिवसांपासून या उपग्रहाचे प्रक्षेपण रखडले होते़ रविवारी पहाटे २ वाजून १० मिनिटाला एरिएन-५ व्हीए २२१ या यानामार्फत या उपग्रहाने जीओसिंक्रोनस ट्रान्सफर आॅर्बिट (जीटीओ)मध्ये प्रवेश केला़ एरियन श्रेणींच्या प्रक्षेपकाद्वारे केलेले हे २२१ वे प्रक्षेपण आहे़ जीसॅट-१६ वर दळणवळणासाठी ४८ ट्रान्सपाँडर आहेत़ भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोद्वारे बनविण्यात आलेल्या आत्तापर्यंतच्या सर्व दळवळण उपग्रहांवर लावण्यात आलेल्या ट्रान्सपाँडरच्या संख्येपेक्षा ही संख्या अधिक आहे़प्रक्षेपणानंतर काही वेळातच कर्नाटकच्या हासनस्थित इस्रोच्या ‘मास्टर कंट्रोल फॅसिलिटी’ या नियंत्रण केंद्राने जीसॅट-१६ चे नियंत्रण आपल्या ताब्यात घेतले़ प्राथमिक पडताळणीअंती हा उपग्रह सामान्य स्थितीत असल्याचे आढळले आहे़यानंतर सोमवारी पहाटे ३ वाजून ५० मिनिटाला हा उपग्रह कक्षेत वर उचलण्यात येईल़ उपग्रहाला भूस्थिर कक्षेत ५५ अंश पूर्व रेखांशावर स्थिर करणे आणि जीसॅट-८, आयआरएनएसएस-१ ए आणि आयआरएनएसएस-१ बीसोबत स्थापित करण्याच्या पहिल्या टप्प्यांतर्गत ही प्रक्रिया पार पाडली जाईल़गत शुक्रवारी जीसॅट-१६ चे प्रक्षेपण होणार होते़ तथापि, कोरू येथील खराब हवामानामुळे याचे प्रक्षेपण काही तासांसाठी पुढे ढकलण्यात आले होते़ कोरू हे भूमध्य रेखेनजीक स्थित असल्यामुळे हे स्थान भूस्थिर कक्षेत स्थापित करण्याच्या मोहिमांसाठी सर्वाधिक उपयुक्त आहे़जीसॅट-१६ हा एक बहुपयोगी दळणवळण उपग्रह आहे़ संपूर्ण भारतीय उपखंड याच्या कार्यकक्षेत असेल़ एरियनस्पेसद्वारे प्रक्षेपित हा इस्रोचा १८ वा उपग्रह आहे़ लाँग मार्चच्या मदतीने चीनी उपग्रह प्रक्षेपितबीजिंग : चीनच्या जुन्या ‘लाँग मार्च’ श्रेणीतील रॉकेटच्या अद्ययावत आवृत्तीच्या माध्यमातून एक बहुउद्देशीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या रॉकेटच्या मदतीने करण्यात आलेले हे २०० वे प्रक्षेपण आहे. ‘लाँग मार्च-४ बी’ रॉकेटच्या मदतीने ‘सीबीईआरएस-४’चे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले असून ते अवकाश कक्षेत स्थिर झाले आहे. या कार्यक्रमांतर्गत पहिला उपग्रह ‘सीबीईआरएस’ आॅक्टोबर १९९९ मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता. यानंतर २००३ दुसऱ्या व २००७ मध्ये तिसऱ्या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. (वृत्तसंस्था)