शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

सुब्रमण्यम स्वामींना हवे ‘जेएनयू’चे कुलपतिपद

By admin | Updated: September 25, 2015 02:55 IST

डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या पुनर्वसनाच्या प्रयत्नाला लागलेल्या मोदी सरकारने प्रतिष्ठित जेएनयू कुलगुरुपदी त्यांच्या नियुक्तीचा घाट घातला असतानाच संभ्रम आणि वादाचे मोहोळ उठले आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीडॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या पुनर्वसनाच्या प्रयत्नाला लागलेल्या मोदी सरकारने प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरुपदी त्यांच्या नियुक्तीचा घाट घातला असतानाच संभ्रम आणि वादाचे मोहोळ उठले आहे. स्वामी यांना विद्यापीठाचे कुलगुरू बनविले जाणार असल्याच्या बातम्या उमटल्या; मात्र त्यांना कुुलगुरू नव्हे तर कुुलपतिपद हवे असल्याचे वृत्त समोर आले आहे.स्वामींना पूर्ण कॅबिनेट मंत्र्याचा दर्जाही हवा आहे. त्यांनी घातलेल्या दोन अटी मोदी सरकारसाठी अडचणींच्या ठरू शकतात. या विद्यापीठाला असलेले नेहरूंचे नाव बदलून सुभाषचंद्र बोस यांचे नाव दिले जावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांना काढून टाकण्याचा (रस्टिकेट) अधिकारही त्यांना हवा आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने स्वामींच्या पूर्वअटींना उत्तर देण्याचे टाळले आहे. या विद्यापीठाचे कुलगुरू एस.के. सोपोरी हे लवकरच निवृत्त होत असून त्यांच्या जागेवर स्वामींचा डोळा असल्याच्या बातम्या अलीकडेच प्रसिद्ध झाल्या. या पदासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. स्वामींनी जाहिरातीनुसार अर्ज केलेला नाही. दुसरी बाब म्हणजे जेएनयूसह केंद्रीय विद्यापीठांमध्ये कुलगुरुंच्या निवृत्तीचे वय ७० वर्षे असताना वयाची ७६ वर्षे गाठलेले स्वामी अपात्रच ठरतात. स्वामींनी मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांची भेट घेतल्यानंतर अफवांना जोर चढला. ४० वर्षांपूर्वी आयआयटी दिल्लीत असताना स्वामींना बडतर्फ करण्यात आले होते.