विद्यार्थ्यांनी यशाची स्वप्ने साकारावीत : गणेश शिंदे

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:37+5:302015-03-14T23:45:37+5:30

सोलापूर : विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात विद्याभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी पर्शिाम करून यशाची नवी स्वप्ने साकारावीत, असे आवाहन गणेश शिंदे (यशदा, पुणे) यांनी केले.

Students should dream of success: Ganesh Shinde | विद्यार्थ्यांनी यशाची स्वप्ने साकारावीत : गणेश शिंदे

विद्यार्थ्यांनी यशाची स्वप्ने साकारावीत : गणेश शिंदे

लापूर : विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात विद्याभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी पर्शिाम करून यशाची नवी स्वप्ने साकारावीत, असे आवाहन गणेश शिंदे (यशदा, पुणे) यांनी केले.
सम्राट चौकातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. रावसाहेब ढवण होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य राजेंद्रसिंह लोखंडे, रासेयोचे समन्वयक डॉ. बी. एन. कांबळे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रशांत नलवडे, प्रा. सुरेश ढेरे, जिल्हा समन्वयक प्रा. संतोष राजगुरू, प्रा. बालाजी शेवाळे उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन केले पाहिजे. वक्तृत्व कला अवगत केली पाहिजे. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. ध्येय साध्य करण्यासाठी पर्शिम करावे लागतात, तरच जीवन सुखकारक होते.
डॉ. कांबळे म्हणाले, रासेयोचा स्वयंसेवक र्शमसंस्कारातून जीवनाची वाटचाल करीत असतो. त्यामुळे स्वावलंबी जीवनाचे धडे त्याला मिळालेले असतात. त्यातून तो उद्योग व्यवसायात यशस्वी होतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक प्रा. संतोष राजगुरू यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नागोराव भुरके यांनी केले. आभार प्रा. बालाजी शेवाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. विजय रेवजे, सुहास जवंजाळ, राहुल गलंडे यांनी पर्शिम घेतले.
फोटो ओळी
लक्ष्मीबाई पाटील महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलताना गणेश शिंदे. व्यासपीठावर डॉ. बी. एन. कांबळे, डॉ. प्रशांत नलवडे, प्रा. सुरेश ढेरे, डॉ. रावसाहेब ढवण, प्रा. संतोष राजगुरू आदी.

Web Title: Students should dream of success: Ganesh Shinde