शिक्षकांसाठी कथाकथन प्रशिक्षण शिबीर

By Admin | Updated: July 12, 2015 23:56 IST2015-07-12T23:56:38+5:302015-07-12T23:56:38+5:30

सोलापूर : महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ आणि सोलापूर जिल्हा सानेगुरुजी कथामाला यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पशाळा येथे शिक्षकांसाठी कथाकथन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Storytelling Training Camp for Teachers | शिक्षकांसाठी कथाकथन प्रशिक्षण शिबीर

शिक्षकांसाठी कथाकथन प्रशिक्षण शिबीर

लापूर : महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ आणि सोलापूर जिल्हा सानेगुरुजी कथामाला यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पशाळा येथे शिक्षकांसाठी कथाकथन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे १६ जुलै रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच या वेळेत आयोजन करण्यात आले असून, या शिबिरात कथाकथन प्रबोधिनी, पुणे या संस्थेचे श्यामराव कराळे व प्रिया पै मार्गदर्शन करणार आहेत.
कथाकथन तंत्र व मंत्र, कथेचे प्रकार, कथेची भेट, कथाकथनातून प्रभावी अध्यापन कसे करावे, याविषयी अभ्यासपूर्ण माहिती शिक्षकांना देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या शिक्षकांना उपक्रमशील बनविणे आणि विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा, या उद्देशाने शिबीर होणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी विष्णू कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. सानेगुरुजी कथामालेचे अवधूत म्हमाणे यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अशोक खानापुरे यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Storytelling Training Camp for Teachers