शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजाराची उसळी

By admin | Updated: June 30, 2014 22:45 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आर्थिक सुधारणा मजबुतीने राबविणार असल्याचे संकेत मिळाल्यामुळे शेअर बाजारांनी आज पुन्हा एकदा उसळी घेतली.

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आर्थिक सुधारणा मजबुतीने राबविणार असल्याचे संकेत मिळाल्यामुळे शेअर बाजारांनी आज पुन्हा एकदा उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 314 अंकांनी उसळून 25,413.78 अंकांवर बंद झाला. या तिमाहीने केलेली कामगिरी गेल्या 5 वर्षातील सर्वोत्तम ठरली आहे. 
बाजारातील सूत्रंच्या मते, जागतिक पातळीवर कच्च तेलाच्या किमती काही प्रमाणात उतरल्या आहेत. त्याचा परिणामही बाजार धारणोवर दिसून आला. आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, आयटीसी, ओएनजीसी, एचडीएफसी, सन फार्मा, एसबीआय, टीसीएस, इन्फोसिस आणि एचडीएफसी या कंपन्यांना आजच्या तेजीचा सर्वाधिक लाभ मिळाला. 
सकाळी बाजार उघडला तो तेजीनेच. 30 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्सची सुरुवात चढत्या आलेखाने झाली. एका टप्प्यावर बाजार 25,460.96 अंकांर्पयत वर गेला होता. नंतर तो थोडा खाली येऊन 313.86 अंकांच्या अथवा 1.25 टक्क्यांच्या वाढीसह 25,413.78 अंकांवर बंद झाला. शुक्रवारी सेन्सेक्स 37 अंकांनी वाढला होता. 
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही आज 102.55 अंकांनी वाढला. निफ्टीची ही वाढ 1.37 टक्के आहे. त्याबरोबर निफ्टीने 7,600 अंकांच्या वर पाऊल टाकले. दिवस अखेरीस तो 7,611.35 अंकांवर बंद झाला.  जागतिक बाजारांतही आज तेजीचे वातावरण दिसून आले. चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवान या आशियाई बाजारांत 0.44 टक्के ते 0.93 टक्क्यांची वाढ नोंदली गेली. सिंगापुरातील बाजार मात्र आज मंदीत होते. युरोपातील बाजार सुरुवातीला संमिश्र कल दाखवीत होते. 
देशांतर्गत बाजारातील मुख्य असलेल्या सेन्सेक्समधील 30 पैकी 24 कंपन्यांना तेजीचा लाभ मिळाला. त्यांचे शेअर्स वर चढले. 6 कंपन्या मात्र या तेजीतही मंदी दर्शवित होत्या. त्यांचे शेअर्स कोसळले. तेजीचा सर्वाधिक 3.87 टक्क्यांचा लाभ सन फार्माला मिळाला, तर मंदीचा सर्वाधिक 1.02 टक्के फटका बजाज ऑटोला बसला. (प्रतिनिधी)
 
430 जूनला संपलेल्या तिमाहीत सेन्सेक्सने 3,027.51 अंकांची कमाई केली आहे. ही वाढ 13.5 टक्के आहे. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले आहे. 
4सरकार बदलल्यानंतर शेअर बाजारातील भांडवलाचा प्रवाह लक्षणीयरीत्या वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून बाजारात तेजी आली आहे. एकटय़ा जून महिन्यात सेन्सेक्स 1,196 अंकांनी वाढला आहे. 
 
4रेलिगेअर सिक्योरिटीजचे अध्यक्ष जयंत मांगलिक यांनी सांगितले की, केंद्रीय अर्थसंकल्पासाठी उलटी गिणती सुरू झाली आहे. गुंतवणूकदारांची नजर सध्या अर्थसंकल्पपूर्व तेजीवर आहे.