शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
3
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
4
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
5
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
6
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
7
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
8
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
9
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
10
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
11
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
12
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
13
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
14
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
15
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
16
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
17
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
18
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
19
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
20
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

स्टिल चोरले....पुरले.... विकले नऊ जणांची टोळी : दोघांना अटक

By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST

अहमदनगर : इमामपूर घाटात ट्रकचालकाला चाकूचा धाक दाखवून १२ टन स्टिलची चोरी करून ते लंपास केल्याप्रकरणातील दोघांना एम.आय.डी. सी. पोलिसांनी अटक केली आहे. स्टिल चोरल्यानंतर त्यांनी ते एका जमिनीत पुरले. त्यातील काही स्टिलची विक्री केली. घाटात वाहनांना लुटणार्‍या नऊ जणांच्या टोळीचा छडा लागला असून त्यातील दोघांना गुरुवारी मध्यरात्री अटक केली आहे,अशी माहिती पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांनी दिली.

अहमदनगर : इमामपूर घाटात ट्रकचालकाला चाकूचा धाक दाखवून १२ टन स्टिलची चोरी करून ते लंपास केल्याप्रकरणातील दोघांना एम.आय.डी. सी. पोलिसांनी अटक केली आहे. स्टिल चोरल्यानंतर त्यांनी ते एका जमिनीत पुरले. त्यातील काही स्टिलची विक्री केली. घाटात वाहनांना लुटणार्‍या नऊ जणांच्या टोळीचा छडा लागला असून त्यातील दोघांना गुरुवारी मध्यरात्री अटक केली आहे,अशी माहिती पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांनी दिली.
औरंगाबाद रोडवरील इमामपूर घाटात २८ फेब्रुवारीला रात्री राजेंद्र नवनाथ घुगे (रा. वडझरी, ता. आष्टी, जि. बीड) हे ट्रकमधून १२ टन स्टिल जालना येथून पुण्याकडे घेऊन निघाले होते. मध्यरात्री सदरचा ट्रक इमामपूर घाटात आल्यानंतर तिघांनी ट्रकला दुचाकी आडवी लावून ट्रकचालकाच्या हातावर चाकूूचा वार करून ट्रकचालकाला मारहाण केली होती. त्यानंतर ते ट्रक घेऊन जाण्याच्या बेतात होते, मात्र १२ टन वजनाचा ट्रक चालविणे चोरट्यांना अशक्य झाले. त्यांनी आणखी एक ट्रॅक्टर मागवून रातोरात ट्रकमधील स्टिलच्या सळाया ट्रॅक्टरमध्ये टाकल्या. त्यानंतर ट्रॅक्टर आणि ट्रकमधील स्टिल मोरगव्हाण (ता. नेवासा) येथील वन खात्याच्या जमिनीमध्ये पुरले. त्यासाठी जेसीबीने खड्डे खोदले. दुसरा स्टिलचा ट्रक करंजी येथील घाटात आणून ठेवला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी स्टिल चोरणार्‍या दोघांना यापूर्वी दुसर्‍या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी इमामपूर घाटातील लुटीच्या घटनेचा शोध घेतला.
स्टिल चोरणारी नऊ जणांची टोळी असल्याचे उघड झाले आहे. त्यातील शुभम विष्णू जाधव (वय २०), राहुल बाबासाहेब दारगुडे (वय २२, रा. मोरगव्हाण, ता. नेवासा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
-----------
निम्मे स्टिल पुरले.. निम्मे विकले...
ट्रकसह १२ टन वजनाचे स्टिल (लोखंडी सळाया) लंपास केल्यानंतर चोरट्यांनी मोरगव्हाण (ता. नेवासा) येथील वनखात्याच्या जमिनीत स्टिल पुरले. १२ पैकी साडेचार टनांची घाटपिंप्री (ता. आष्टी, जि.बीड) येथे विक्री केल्याची कबुली चोरट्यांनी दिली. तर ७ ते ८ टन स्टिल वनखात्याच्या जमिनीत पुरले. चोरट्यांनी जेसीबीद्वारे खड्डे खोदले आणि जेसीबीच्या सहाय्यानेच ते पुरले.
---------
अपूर्ण.....