शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी बनली 'कमला', महाकुंभमध्ये होणार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:27 IST

महायकुंभमध्ये स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन जॉब्स सहभागी होणार आहेत, अशी माहिती स्वामी कैलाशानंद महाराज यांनी दिली.

देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे प्रयागराज भूमीवर कोणत्याही आवाहनाशिवाय किंवा निमंत्रण न देता ज्या कारणाने आगमन होते, ते निमित्त म्हणजे महाकुंभमेळा. काही दिवसातच महाकुंभ मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. या कुंभ  मेळाव्यात जगभरातील दिग्गज लोक सहभागी होणार आहेत. अॅपल कंपनीचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स  यांची पत्नी लॉरेन जॉब्स सहभागी होणार आहेत. ६१ वर्षीय लॉरेन जॉब्स १३ जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये पोहोचणार आहेत. 

नेपाळमार्गे चीनला पाठवले जाणारे लाखो रुपयांचे मानवी केस जप्त; ३ तस्करांना अटक

लॉरेन जॉब्स या १३ जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये येणार असून २९ जानेवारीपर्यंत निरंजनी आखाड्यातील आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या शिबिरामध्ये राहणार आहेत. स्वामींनी त्यांना त्यांचे गोत्र दिले आहे. त्यांचे नाव 'कमला' ठेवले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन जॉब्स याआधीच्या महाकुंभ मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. त्या हिंदू धर्मावर विश्वास ठेवतात. कुंभ व्यतिरिक्त, त्यांचे भारतात काही वैयक्तिक कार्यक्रम आहेत, यामध्ये त्या सहभागी होणार आहेत. २०२० च्या फोर्ब्स अंकात जगातील अब्जाधीशांच्या यादीत लॉरेन जॉब्स ५९ व्या क्रमांकावर होत्या.

जगातील अनेक दिग्गज सहभागी होणार 

स्वामी कैलाशानंद यांनी माध्यमांना सांगितले की, लॉरेन जॉब्स यांच्या सहीत जगभरातील अनेक दिग्गज लोक कुंभमेळाव्यात सहभागी होणार आहेत. आम्ही या सगळ्यांचे स्वागत करणार आहे. लॉरेन जॉब्स या कुंभ मेळाव्यात सहभागी होण्यासाठी येत आहेत. यासह त्या आपल्या गुरुंनाही भेटणार आहेत. स्वामींनी त्यांना गोत्र दिले आहे, त्यांचे नाव कमला असं ठेवलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, महाकुंभ मध्ये लॉरेन जॉब्स कल्पवास देखील करणार आहेत. हिंदू धर्मामध्ये कुंभ आणि माघ महिन्यात साधुंसह गृहस्थांसाठी कल्पवासची परंपरा आहे. या काळात गृहस्थांना शिक्षण आणि दिक्षा दिली जाते. यासाठी काही नियम आणि धार्मिक मान्यता असतात.

टॅग्स :Steve Jobsस्टीव्ह जॉब्स