शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

स्टाफ सिलेक्शन कमीशनचा पेपर फुटला, १८ कॉपी बहाद्दरांना अटक

By admin | Updated: November 10, 2014 18:34 IST

या परीक्षेत १८ जणांना कॉपी करताना पकडण्यात आले. या पूर्वीही दोन नोव्हेंबर रोजी याच पदाकरता झालेल्या परीक्षेत तीन जणांना कॉपी करताना अटक केली होती

ऑनलाइन लोकमत
अल्मोडा(उत्तराखंड), दि. १० - ९ नोव्हेंबर (रविवार) रोजी कर्मचारी चयन आयोगाने (स्टाफ सिलेक्शन कमीशन)  इयत्ता बारावी पास शैक्षणिक आर्हता असलेल्या उमेदवारांची परीक्षा घेतली होती. या परीक्षेत १८ जणांना कॉपी करताना पकडण्यात आले. यापैकी एका विद्यायार्थ्याने कॉपी गिळत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या पूर्वीही दोन नोव्हेंबर रोजी याच पदाकरता झालेल्या परीक्षेत तीन जणांना कॉपी करताना अटक केली होती. पकडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना याबाबत अधिक विचारले असता या मागे स्पर्धा परीक्षेचे क्लास चालवणारा एक शिक्षक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हलद्वानी येथील कर्मचारी चयन आयोगाचे अधिकारी हरबीर सिंह आणि जीसी टम्टा यांनी रविवारी सकाळी डिएवी सीनीयर सेकंडरी शाळेत छापा मारत सौरभ धामा या विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान मोबाईल घेउन बसला असताना पकडले. त्याची अधिक चौकशी केली असता मेरठ येथे स्पर्धा परीक्षांची शिकवणी घेणा-या पंकज धामाने त्याला प्रश्नपत्रिकेची उत्तरं आगोदर पुरवली असल्याचे त्याने सांगितले. शनिवारी(दि.८ नोव्हेंबर) संध्याकाळी एका अज्ञात व्यक्तीने या प्रकरणाबाबत डिएवी शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहून कळवले होते. 
त्यानंतर या अधिका-यांनी क्वीन्स हायर सेकंडरी शाळेत छापा घालत निर्दोष कुमार, सन्नी पवार,  बृजमोहन, पट्टी रामपूर या चौघांना कॉपी करताना पकडले. तसेच क्वीन्स शाळेतीलच दुपारच्या सत्रात परीक्षा द्यायला आलेल्या अंकुर, अविनाश, विनित आणि सोनू या चौघांना कॉपी करताना पकडले. केंद्र निरीक्षक रनवीर ठाकूर यांच्या देखरेखी अंतर्गत या विद्यार्थ्यांची कॉपी  मोहरबंद करण्यात आली, व या घटनेची माहिती कर्मचारी चयन आयोगाच्या दिल्ली येथील मुख्यालयाला देण्यात आली.