क्रीडा भारती फुटबॉल क्लबचे प्रशिक्षण

By Admin | Updated: August 13, 2015 22:34 IST2015-08-13T22:34:36+5:302015-08-13T22:34:36+5:30

सोलापूर: क्रीडा भारती फुटबॉल क्लबच्या वतीने १५ वर्षांखालील मुलांसाठी शनिवार, दि़ १५ ऑगस्ट व रविवार १६ ऑगस्ट रोजी हरिभाई देवकरण प्रशालेच्या क्रीडांगणावर वार्षिक अकॅडमीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याचे सचिव राजेश कळमणकर यांनी कळविले आहे़ या वार्षिक अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थींसाठी ऑल इंडिया युथ फुटबॉल अकॅडमी, पुणे येथील तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे़ (क्रीडा प्रतिनिधी)

Sports Training of Sports Bharti Football Club | क्रीडा भारती फुटबॉल क्लबचे प्रशिक्षण

क्रीडा भारती फुटबॉल क्लबचे प्रशिक्षण

लापूर : माळढोक अभयारण्याच्या नावाखाली गेल्या तीन वर्षांपासून अडकलेल्या खासगी जमिनींचा तिढा अखेर सुटला आहे़ राज्य वन्यजीव मंडळाच्या पत्रानुसार माळढोक अभयारण्यासाठी भूसंपादित केलेले ४९० चौरस किलोमीटर क्षेत्र वगळता उर्वरित सर्व खासगी क्षेत्रावर जमिनीचा वापर बदल होणार नाही, या अटीवर खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला मंजुरी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी पत्रकारांना दिली़ या निर्णयामुळे राज्यातील इतर माळढोक क्षेत्रातील नागरिकांना लाभ होणार आहे़
मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून याबाबत पत्र आले आहे़ उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा आदी तहसीलदारांना तसेच दुय्यम निबंधकांना खरेदी-विक्री व्यवहार करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी आदेश काढले आहेत़ गेल्या तीन वर्षांपासून माळढोकचे भूत सोलापूरच्या मानगुटीवर बसल्यामुळे अनेक लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठविला होता़ वारंवार शासनाने देखील सुस्पष्ट आदेश दिला नव्हता, आता आदेश आल्यामुळे नान्नज अभयारण्य क्षेत्रातील नान्नज (३५ हेक्टर), मार्डी (३८३ हेक्टर), अकोलेकाटी (२१ हेक्टर) आणि नरोटेवाडी (३४ हेक्टर) हे माळढोकसाठी भूसंपादित केलेले क्षेत्र वगळता सर्व खासगी जमिनींची खरेदी-विक्री करता येणार आहे़

Web Title: Sports Training of Sports Bharti Football Club