शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

By मोरेश्वर येरम | Updated: December 16, 2020 19:34 IST

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव बाबा राम सिंग असल्याची माहिती समोर आली असून ते कर्नालच्या सिंगरा गावातील रहिवासी आहेत.

ठळक मुद्देकुंडली सीमेवर आतापर्यंत चार शेतकऱ्यांचा मृत्यूआंदोलक शेतकऱ्यानं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलीयरुग्णालयात नेण्याआधीच शेतकऱ्याचा मृत्यू

सोनिपतसोनिपतच्या कुंडली सीमेवर शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. 

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव बाबा राम सिंग असल्याची माहिती समोर आली असून ते कर्नालच्या सिंगरा गावातील रहिवासी आहेत. बाबा राम सिंग हे त्यांच्या गावातील गुरुद्वारेतील ग्रंथी होते. ते गेले २० दिवस रोज शेतकरी आंदोलनासाठी कर्नाल ते कुंडली सीमा असा प्रवास करत होते. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा राम सिंग आजही आंदोलनात सहभागी होण्यासाठी कुंडली सीमेवर आले होते. आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या व्यासपीठाच्या मागे जाऊन त्यांनी स्वत:वर गोळी झाडली. त्यांच्याकडे असलेल्या खासगी बंदुकीतून त्यांनी गोळी झाडल्याचं समजतं. बाबा राम सिंग यांच्या या कृत्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने पानीपत येथील रुग्णालयात उपचारासाठी नेलं. पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं आहे. राम सिंग यांचे पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचं कळतंय. 

कुंडली सीमेवरील सलग तिसऱ्या दिवशी आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यूकुंडली सीमेवर गेल्या तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची ही  तिसरी घटना आहे. तर आतापर्यंत या सीमेवर चार जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी सोमवारी आणि मंगळवारी सकाळी आंदोलनस्थळी प्रत्येकी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. वाढत्या थंडीमुळे वयस्कर शेतकऱ्यांची प्रकृती बिघडत आहे. यात ब्लडप्रेशर आणि तणावामुळे हृदयविकाराचा झटका येऊन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीfarmer suicideशेतकरी आत्महत्या