सोनिया गांधी यांना श्वसनाचा त्रास, रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 06:12 IST2026-01-07T06:12:29+5:302026-01-07T06:12:29+5:30
सूत्रांनी सांगितले, थंड हवामान आणि वायू प्रदूषणामुळे त्यांचा दमा थोडा वाढला होता.

सोनिया गांधी यांना श्वसनाचा त्रास, रुग्णालयात दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना श्वसनास त्रास होऊ लागल्याने दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
सूत्रांनी सांगितले, थंड हवामान आणि वायू प्रदूषणामुळे त्यांचा दमा थोडा वाढला होता. त्यांना अँटिबायोटिक व इतर औषधे देण्यात आली आहेत. त्या पूर्णपणे बऱ्या झाल्यानंतर डॉक्टर त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देतील. हा निर्णय एक ते दोन दिवसांतही घेण्यात येऊ शकतो.