शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

गीतेंचा राजीनामा नाही!

By admin | Updated: November 14, 2014 02:01 IST

महाराष्ट्रात भाजपाला प्रखर विरोध करणारे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचे कोणतेही निर्देश अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना अद्याप दिलेले नाहीत.

हरीश गुप्ता - नवी दिल्ली
महाराष्ट्रात भाजपाला प्रखर विरोध करणारे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचे कोणतेही निर्देश अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना अद्याप दिलेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका बजावणारी शिवसेना केंद्रातील मोदी सरकारमध्ये कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या आठवडय़ाच्या प्रारंभी मुंबईहून दिल्लीत पोहोचलेले गीते यांनी अद्याप मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहा दिवसांच्या विदेश दौ:यावर रवाना झाले असताना गीते यांनी मात्र आपल्या मतदारसंघात जाणोच पसंत केले आहे. पुढच्या सोमवारी ते उद्योग भवनमधील आपल्या कार्यालयात हजेरी लावतील.
दरम्यान महाराष्ट्रात भाजपाला विरोध आणि केंद्रात  मैत्री करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या दुहेरी धोरणामुळे शिवसेनेचे नेते कमालीचे गोंधळलेले दिसत आहेत. महाराष्ट्रात भाजप सरकार अल्पमतात असले तरी सरकार टिकविण्यासाठी भाजपाला शिवसेनेची अजिबात गरज नाही. केंद्रात तर भाजपा सरकार बहुमतात आहे. त्यामुळे तेथेही भाजपाला शिवसेनेची आवश्यकता वाटत नाही. लोकसभेत रालोआला शिवसेनेच्या 18 खासदारांच्या पाठिंब्याची गरज नाही. असे असले तरी शिवसेनेला विचार करण्यासाठी आणखी वेळ देण्याचा रालोआ नेतृत्वाचा विचार आहे. यावरून रालोआदेखील शिवसेनेला सोडण्याचा विचार करीत नसल्याचे स्पष्ट होते.
रालोआ अल्पमतात असलेल्या राज्यसभेत शिवसेनेचे तीन खासदार आहेत. राज्यसभेत सर्व धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्ष 
एकजूट आहेत. भविष्यात शिवसेनेची आवश्यकता पडू शकते, असे रालोआला वाटत असल्यामुळे गीते यांना राजीनामा 
देण्यास सांगितले जाईल अथवा भविष्यात ते स्वत:हून राजीनामा देतील, अशी शक्यता दिसत नाही. मोदी विदेश दौ:यावर आहे. ते 2क् नोव्हेंबरला परत येतील. तोर्पयत तरी गीते केंद्रीय मंत्रिमंडळात कायम राहणार आहेत.